Aaditya Thackeray :”32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना?” संजय राऊत यांनी पुन्हा एकनाथ शिंदेंना डिवचलं
मुंबई : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जाहीर आव्हान दिले. त्यांनतर गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीमधील कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात होते. या दोघांचा कोळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा आणि शिंदे गटाच्या नेतेमंडळींनी भाषणांमधून जोरदार टोलेबाजीही केली. एकप्रकारे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपाची नेतेमंडळी शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं या कार्यक्रमाबद्दल बोललं गेलं. पण या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
असाच एक व्हिडीओ शेअर करत ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. राऊत यांनी रिकाम्या खुर्च्याचा व्हिडीओ शेअर करून “32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना?” असं म्हणत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांच भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. @वरळी
कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला..
कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय..
32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना? pic.twitter.com/FoYvWFVTIn— Sanjay Raut (@rautsanjay61) February 7, 2023
राऊत यांनी कार्यक्रमातून लोक घरी जातानाचा व्हिडिओ शेअर करत लिहलं आहे की, “मुख्यमंत्र्यांच भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला.. कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय.. 32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना?”