Kasba Bypoll Result 2023 : रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “महाराष्ट्रात जी गद्दारी झाली…”
मुंबई : कसबा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठा विजय झाला. त्यांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा (Hemant Rasne) तब्बल ११ हजार ४० मतांनी पराभव केला. महाविकास आघाडीसाठी हे मोठं यश आहे. दरम्यान, या विजयानंतर आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आनंद व्यक्त केला. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
https://www.youtube.com/watch?v=BERIduaZOvg
आज कसब्यात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात जी गद्दारी झाली आणि राजकीय वातावरण निर्माण झाले, ते कोणालाही आवडलेलं नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच ३२ वर्षांनंतर ही जागा काँग्रेसकडे आली आहे. कसब्यासारख्या भाजपाच्या बालेकिल्ल्यात हे परिवर्तन होऊ शकतं, हे फार बोलकं आहे. हेच परिवर्तन आता पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात होणार आहे, असेही ते म्हणाले.
kasba By Poll Result : रवींद्र धंगेकर विजयी; भाजपला धूळ चारली
गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच धंगेकरांनी आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. सुरुवातीच्या मतमोजणीत फारशी आघाडी नव्हती. त्यानंतर आघाडी वाढत गेली. दहाव्या फेरीनंतर दोघांच्या मतातील फरक मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यानंतर धंगेकरांच्या समर्थकांनी विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली. काही फेऱ्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. मात्र, ती काही काळापर्यंतच होती. शेवटच्या फेरीअखेर धंगेकरांना 72 हजार 599 मते मिळाली. तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना 61 हजार 771 मते मिळाली.
ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनीही प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री इतकेच काय तर स्वतः खासदार गिरीश बापट (Girish Bapat) आजारी असतानाही प्रचारात उतरले होते. प्रचारातही तसा जोश दिसत होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही (MVA) जोरदार प्रचार केला. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. विजयी कोण होणार, याचीच चर्चा होती.