अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री, नाशिकमध्ये राष्ट्रवादीची बॅनरबाजी
नाशिक : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर गेले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधान आले आहे. या अगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आणि खासदार सुप्रिया सुळेंबाबतही अशीच पोस्टरबाजी करण्यात आली होती. पण यावर हे कार्यकर्त्यांचं प्रेम असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीकडून देण्यात आलं होत.
नाशिक येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे शेतकरी मेळाव्याला उपस्थित होता त्यावेळी ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मेळाव्याच्या ठिकाणीच ही पोस्टरबाजी करण्यात आली होती. यावेळी जितेंद्र आव्हाड देखील या मंचावर उपस्थित होते. यावेळी कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे देखील उपस्थित होते.
Narayan Rane Vs Uddhav Thackeray : ठाकरे फक्त ‘मातोश्री’चे मुख्यमंत्री होते… त्यांचा पक्ष संपला!
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी उपस्थितांना रामनवमी आणि रमजान अशा दोन्ही सणांच्या शुभेच्छा दिल्या. तर शेतकऱ्यांच्या समस्यांवरून त्यांनी यावेळी शिंदे-फडणवीसांवर टीका देखील केली.