तेव्हापासून अजितदादांच्या नाराजीला वाट फुटली; शिरसाटांनी गुपित फोडलं

  • Written By: Published:
तेव्हापासून अजितदादांच्या नाराजीला वाट फुटली; शिरसाटांनी गुपित फोडलं

Sanjay Sirsat On Ajit Pawar :  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राष्ट्रवादीचेमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यात अजितदादा भाजपसोबत जाणाऱ असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची चर्चा व्यक्त केली जात आहे. मात्र, या सर्व चर्चांवर काहीवेळापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ही केवळ तुमच्या (माध्यमांच्या) मनातील चर्चा आहेत. या सर्व बातम्या खोट्या आहेत. अजित पवारही पक्षाचं काम करतायत. राष्ट्रवादीमध्ये सर्व काहीआलबेल आहे. सगळे सहकारी पक्षाला मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत.” असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी आज दिलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…मी काय अजित पवार यांचा प्रवक्ता नाही

तर, दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजितदादां नाराजी केव्हापासून सुरू झाली याविषयी भाष्य केले आहे. त्यांच्या नव्या विधानामुळे आता नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिरसाट म्हणाले की, अजितदादा आज नाराज झाले आहेत का? तर, नाही अजितदादांच्या नाराजीची खरी सुरूवात त्यांचा चिरंजीव पार्थ पवार यांचा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून सुरू झाली आहे. या पराभवापासून दादांच्या नाराजीला वाट मिळाल्याचे शिरसाट म्हणाले. शिंदे गटाची न्यायालयातील केस आणि नाराजी यांचा काहीही संबंध नसल्याचे यावेळी शिरसाट यांनी स्पष्ट केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…मी काय अजित पवार यांचा प्रवक्ता नाही

अजित पवार शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत आहे, असे मत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांना भाजपची कोणतीही ऑफर नसल्याचेही ते  म्हणाले. अजितदादा नॉट रिचेबल होणं नवीन नाही. ज्याअर्थी राष्ट्रवादीचे आमदार मुंबईला येत आहेत, त्यावरुन असे कळते की काही तरी होणार आहे. कोर्टातील केस व अजितदादा यांचा काही संबंध नाही. पार्थ पवार यांचा पराभव झाल्याने अजितदादा नाराज झाल्यापासून अजितदादा नाराज झाले आहेत. अजितदादा आमच्याकडे आले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube