अजित पवारांची काढली वैचारिक उंची, नितेश राणेंनी पुन्हा ललकारलं

अजित पवारांची काढली वैचारिक उंची, नितेश राणेंनी पुन्हा ललकारलं

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या टिकेवरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तिखट शब्दात टीका केलीय. त्यांनी ट्वीट करत अजित पवार यांच्यावर टिकास्त्र सोडलंय. देवानं मला दिलेल्या शरिरयष्टीवरुन भाष्य करुन अजित पवार यांची वैचारिक उंची समजते. त्यांना औरंग्यावरची टीका सहन झाली नाही हेच यावरुन सिद्ध झालं अशा आशयाचं ट्वीट करत अजित पवार यांना नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची’ टिका सहन होत नाही, म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही.

हिवाळी अधिवेशनामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते असं सांगितलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांवर टिकेची झोड उठवली होती. त्यावर अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. एकीकडं आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगतानाच, दुसरीकडं शरद पवाराच्या भूमिकेशी सहमत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टिकेवर प्रश्न विचारला होता, नितेश राणे म्हणाले होते शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख करत नाहीत, शिवाय ते आजपर्यंत कधीही रायगडावर गेले नाहीत, असा प्रश्न अजित पवार यांना विचारला होता, त्यावर पवार म्हणाले की टिल्ल्या लोकांनी असं काही सांगायचं कारण नाही. त्यांची उंची किती? त्यांची झेप किती? त्यांना मी कशाला उत्तर देऊ? माझे बाकीचे प्रवक्ते उत्तर देतील, असल्यांच्या नादी लागत नसतो मी, असं उत्तर दिलं होतं.

त्यापूर्वी नितेश राणे यांनी ट्वीटच्या माध्यमातून ललकारलं होतं. ‘धरणवीर’ना ‘धर्मवीर’ कसे समजणार… आता धर्म रक्षणासाठी तलवार नको ‘शाही पेन’ ही चालेल…, असे ट्वीट करत राणे यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आता या ट्वीटनंतर अजित पवार नितेश राणे यांना काय उत्तर देणार? हे पाहावं लागणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube