Arvind Savant यांच्या रिक्षावाल्याच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…

Arvind Savant यांच्या रिक्षावाल्याच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…

मुंबई : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी एक वक्तव्य केलं. त्यावरून राजकारण चांगलच तापल्याचं पाहायला मिळालं.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले होते की, ‘रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं शरद पवार एकनाथ शिंदेंच्याबद्दल म्हणाले होते. त्यावरून राजकारण चांगलच तापल्याचं पाहायला मिळालं. पण त्यानंतर लगेचच अरविंद सावंत यांनी आपल्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं ते यावेळी म्हणाले की, रिक्षावाला हा शब्द पवारांचा नाही. माझा आहे. पवार तर शिंदेंच्या हाताखाली काम करणार का? असं म्हणाले होते.

संभाजी ब्रिगेडला महाविकास आघाडीची साथ, आगामी निवडणुका सोबत लढणार

या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी रिक्षावाला हा माझाच शब्द आहे. पवारसाहेबांचा नाही. मी पवारसाहेब यांचे नाव घेतले पण शब्द माझा… उध्दवजी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होते. असे म्हटले होते. त्यामुळे हा वाद अरविंद सावंत यांनी क्लिअर केला आहे. असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube