अजितदादांनी आव्हान स्विकारले, पुढच्या सभेत थेट फडणवीसांवर बोलणार

अजितदादांनी आव्हान स्विकारले, पुढच्या सभेत थेट फडणवीसांवर बोलणार

मुंबई : राज्याच्या राजकारण खलबळ उडून देणाऱ्या पाहाटेच्या शपथविधीपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात मैत्री असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दोघेही जाहीर सभेतून टीका करताना एकमेकांचे नाव घेण्याचे टाळताता अशी देखील कुजबूज आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमधील सभेत आला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे एकदाही नाव घेतले नाही. याविषयी अजित पवार यांना विचारले असता त्यांनी हे चॅलेंज स्विकारले आहे.

अजित पवार यांना एका पत्रकाराने विचारले की तुम्ही जाहीर सभेत टीका करताना देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत नाहीत. यावर अजित पवार म्हणाले, पुढच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन भाषण करतो, असे मिश्किल त्यांनी उत्तर दिले. ते पुढं म्हणाले, तुमची सुचना अजित पवारने स्विकारली आहे. त्याचे पडसाद पुढच्या नागपूरच्या जाहीर सभेत मला बोलण्याची संधी मिळाली तर नक्की दिसतील. नागपूर हे त्यांचे होमग्राउंड आहे. तिथं बोललेले अजून प्रभावी होईल असं मला वाटतं, असे अजित पवार यांनी सांगितले.

1992 सालचा फाँट 1983 सालच्या सर्टिफिकेट वर कसा? काँग्रेसचा मोदींना सवाल

वज्रमुठ सभेत अजित पवार म्हणाले?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानकारक उद्गार काढले होते. त्यावेळेस भाजप आणि शिंदे गटानं राज्यपालांविषयी ब्र शब्दही काढला नाही. ते आज ज्या पध्दतीने सावरकर गौरव यात्रा काढतात, तशी त्यावेळेस राज्यपालांविरोधात का भूमिका घेतली नाही. त्यावेळी का गौरव यात्रा काढली नाही? तेव्हा का मूग गिळून गप्प होता, अशी टीका केली होती.

तसेच आमची सावरकरांवर श्रद्धा आहेत. आता तुमचं राज्यात सरकार आहे आणि केंद्रातही सरकार आहे. तुमच्यात खरोखर धमक असेल तर तुम्ही सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देऊन दाखवा. निव्वळ राजकारण करण्यासाठी सावरकरांच्या नावाचा उपयोग करू नका, असं ते म्हणाले.

महाविकास आघाडीची पुढची सभा नागपूरमध्ये होणार आहे. आता खरंच अजित पवार दिलेल्या शब्दाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतील का? आणि मुद्द्यावरुन टीका करतात हे पाहावे लागणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube