अमोल मिटकरींचा भाजपला टोला; म्हणाले, ‘नागपूरकर गाणार आज कमळाबाई…’
नागपूर : महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) असलेले नागपूर शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सुधाकर आडबाले (Sudhakar Adbale) हे विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे (BJP ) उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव झाला. १० वर्षापासून नागपूरची जागा ही भाजपकडे होती, पण यावेळेस ती महाविकास आघाडीने जिंकली आहे. यावरून राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ट्विट करून टोला लगावला.
देवेंद्रजी फडणवीस यांची जादू कोकणात चालली, महाराष्ट्रात चालली , जगभरात चालली मात्र नागपुर मध्ये का नाही चालली ? “दया कुछ तो गडबड है” असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले त्यांचें व दुसरीकडे नागपूरचे वैभव रेशीमबागसंघ कार्यालय, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला.
महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांना १४०६९ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार नागोराव गाणार यांना ६३६६ मतं मिळाली आहेत. ७ हजाराहून अधिक मतांनी गाणार यांचा पराभव झाला. नागपूरकर “गाणार” आज “कमळाबाई” जाणार बावन “कुळां” चा उद्धार , काही दिवसात होणार, संघाच्या बागेत देवेंद्रजीची -दरी, नितीन जी ठरतील का भावी “गड”करी ? असा खोचक ट्विट करत अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली.