Ramesh Bornare : शिंदे गटाचे आमदार आणि पोलिसांमध्ये हुज्जत; गाडी अडवल्याने राडा

Ramesh Bornare : शिंदे गटाचे आमदार आणि पोलिसांमध्ये हुज्जत; गाडी अडवल्याने राडा

औरंगाबाद : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात बैठक पार पडत आहे. मात्र याच बैठकीसाठी आलेल्या शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांची गाडी पोलिसांनी अडवल्याने आमदार बोरनारे यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. त्यामुळे पोलीस (Police) आणि बोरनारे यांच्या शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. तर सर्व आमदारांच्या गाड्या सोडत असताना फक्त माझीच गाडी पोलिसांनी अडवली असल्याचा आरोप बोरनारे यांनी केला आहे.

यामुळे थेट पोलीस आयुक्त निखिल गुप्ता (Nikhil Gupta)  घटनास्थळी येऊन हस्तक्षेप केल्याने हा वाद मिटला. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये २०२३३-२४ च्या आराखड्याची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पार पडत आहे. यामुळे या बैठकीसाठी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकरी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहेत. बोरनारे हे काही दिवसांपूर्वी महालगाव येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी गेले होते, तेव्हा तेथे त्यांचा वाद झाला होता.

दरम्यान यावेळी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या ड्रायव्हर आणि पोलिसांत गाडी आतमध्ये सोडण्यावरून वाद झाला. यानंतर याची माहिती मिळताच स्वतः आमदार रमेश बोरनारे घटनास्थळी आले. सर्व आमदार यांच्या गाड्या सोडल्या असताना फक्त माझीच गाडी का अडवत असल्याचा त्यांनी पोलिसांना जाब विचारला. यामुळे बोरनारे आणि पोलिसात बाचाबाची झाली. यामुळे काही वेळेसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube