‘त्यांचे’ खबरे मिटविण्याची भाषा करतायत; थोरातांचा विखेंवर निशाणा

  • Written By: Published:
'थोरात दुसऱ्यांची तळी उचलण्यात धन्यता मानतात', महसूलमंत्री विखेंचा खोचक टोला

Balasaheb Thorat On Radhakisan Vikhe

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात जोरदार राजकारण पेटले आहे. या दोघांनी एकमेंकाविरोधात बाजार समितीत पॅनल दिला आहे. संगमनेर बाजार समितीच्या निवडणूक प्रचार सभेत थोरात यांनी विखेंचा जोरदार समाचार घेतला आहे. विखे हे संगमनेरमध्ये येऊन दहशतीचे राजकारण करत आहेत. त्यामुळे कामे बंद पडले आहेत. कारवाई केल्यानंतर मिटवून देण्यासाठी खबरे ठेवल्याचा आरोपही थोरात यांनी विखेंवर केला आहे.

राजकारणात वर-खाली होतं असतं, पण मी थांबणार नाही, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

थोरात म्हणाले, मीही महसूल मंत्री होतो. सर्वांचे काम करत होतो. आता ते महसूल मंत्री झाले. महसूल मंत्री झाल्यावर त्यांनी पहिली मिरवणूक संगमनेरमध्ये काढली होती. संगमनेर तालुक्यात ते जिरावयची भाषा करत आहेत. पण ते उद्योग व्यवसाय बंद पाडत आहेत. खडीचे सेंटर बंद पाडले आहेत. रस्त्याचे कामे बंद झाले आहेत. निळवंडेच्या डावा, उजव्या कालव्याचे काम त्यांनी बंद केल्याचा आरोपही थोरात यांनी केला आहे.

डॉ. सुधीर तांबे यांनाही त्रास देण्याचे काम केले आहेत. त्यांच्यावर तीन केसेस दाखल केल्या आहेत. अनेकदांना त्रास देण्याचे काम सुरू आहेत. संगमनेर तालुक्याला मातीत घालायचे काम सुरू आहेत. काही लोकांना दहा कोटींचा दंड केला आहे. पाणी योजनेत हस्तक्षेप करून तेथे त्यांचे फोटो लावले जात आहे. त्यांचे खबरे आता प्रकरण मिटवून देत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube