सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! अजित पवार गटातील एका मंत्र्याने शरद पवारांची गुप्त भेट घेतल्याचा दावा?
Big shock to Sunetra Pawar अजित पवार गटातील एका मंत्र्याने शरद पवारांची भेट घेऊन विलिनीकरणावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Big shock to Sunetra Pawar! Claim that a minister from Ajit’s group had a secret meeting with Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष आता अधिक गंभीर रूप धारण करत असल्याचे चित्र आहे. अजित पवार गटातील बड्या नेत्यांनी दोन्ही गटांच्या विलिनीकरणाला जाहीर विरोध दर्शवला असतानाही, गटातील एका विद्यमान मंत्र्याने शरद पवार यांची भेट घेऊन विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवार गटातील या मंत्र्याने शरद पवार यांच्याशी गुप्त भेट घेतली. या भेटीत दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकीकरणावर चर्चा झाल्याचे समजते. याशिवाय, अजित गटातील 15 ते 20 आमदारांनीही शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अजित पवार गटातील आमदारांमध्ये सध्या मोठी अस्वस्थता पसरली आहे. पक्षातील सततचे वाद-विवाद आणि फूट यामुळे अनेक आमदारांच्या मतदारसंघांतील कार्यकर्ते आणि मतदार नाराज असल्याच्या चर्चा आहे. भविष्यातील निवडणुकीचा विचार करता पक्षाला फटका बसू शकतो.
Iran War Explainer : इराणमध्ये अमेरिकन पायलट अडकला, सुटका होणार की शिक्षा? नियम काय?
त्यामुळे काही आमदारांना पक्ष बळकट करायचा असेल तर शरद पवारांसोबत जायला हवं असे वाटत असल्याचा दावा देखील माध्यमांमधून केला जात आहे. मात्र, दोन्ही गटांमध्ये सलोख्याची शक्यता सध्या तरी कमी दिसत आहे. जर अशाप्रकारची घडामोड घडली तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप निर्माण करू शकते. अजित पवार गटातील बड्या नेत्यांचा विलिनीकरणाला विरोध असला तरी, गटातील आमदार आणि एका मंत्र्याच्या हालचालींमुळे पक्षांतर्गत समीकरणे बदलण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
‘तिघी’चा प्रवास पाचव्या आठवड्यात! प्रेक्षकांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद कायम
यावर अमोल मिटकरी यांनी आशा कोणत्याही प्रकारची आमदारांकडून हालचाल झाले नसल्याचं विश्वास व्यक्त करत अशा प्रकारच्या बातम्या तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले की शरद पवारांना राज्यातील मुख्यमंत्र्यांपासून मंत्री तसेच केंद्रीय मंत्री देखील भेटत असतात, त्यामुळे एका मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेत,ली त्याचा अर्थ विलनीकरणासाठी भेटले असा घेता येणार नाही त्यासोबतच शरद पवारांना राज्यातील सर्वच पक्षांचे आमदार भेटत असतात.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारांविषयी कोणती घडामोडी घडलेली नाही तसेच आमच्या पक्षासाठी विलनीकरण हा मुद्दा नसून पक्ष संघटना बांधणी हे आमचे लक्ष आहे. विलनीकरण आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भातील सुरू असलेल्या बातम्या या अफवा असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितले आहे. सध्या दोन्ही गटांमध्ये चर्चा सुरू असल्याचे वृत्त सूत्रांकडून जरी समोर येत असलं तरी अधिकृत पातळीवर कोणतीही पुष्टी झालेली नाही. जोपर्यंत दोन्ही पक्षाकडून अधिकृतपणे यावर भाष्य केले जात नाही तोपर्यंत सर्च घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.