सुजय विखेंनी बाळासाहेब थोरांताना ललकारलं; अहमदनगरमध्ये होणार चुरशीचा सामना?

सुजय विखेंनी बाळासाहेब थोरांताना ललकारलं; अहमदनगरमध्ये होणार चुरशीचा सामना?

Sujay Vikhe On Balasaheb Thorat :  भाजपचे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आज ( 7 जून ) रोजी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपचे जनसंपर्क अभियान सुरु झाले आहे. त्यानिमित्ताने भाजपच्या नेते ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी सुजय विखे यांनी गेल्या 9 वर्षांतील मोदी सरकारच्या काळातील कामांची माहिती दिली. तसेच त्यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या जागेवरदेखील भाष्य केले.

सुजय विखे यांनी 2019 साली भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात संग्राम जगताप यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता 2024 साली सुजय विखेंच्या विरुद्ध कोण उभे राहणार याची चर्चा सुरु असतानाचा विखेंनी केलेलं वक्तव्य चर्चेत आले आहे. सुजय विखे यांना पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब थोरात हे जर अहमदनगर दक्षिणमधून लोकसभेला उभे राहिले तर यावर तुमचे काय मत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला विखेंनी खुमासदार उत्तर दिले आहे.

Radhakrishna Vikhe Patil यांना हादरे देण्यासाठी बाळासाहेब थोरातांना कोल्हे गटाची रसद

थोरात साहेब हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्यासारख्या अनुभवी माणसाला नागरिकांनी संधी दिली तर नागरिकांनाही आनंद होऊ शकतो. जर त्यांना उमेदवारी मिळाली तर चांगली स्पर्धात्मक व रंजक निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर काँग्रेसने त्यांना संधी दिली तर नगर जिल्हा काय विचार करतो व भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असेल त्यावर या गोष्टी ठरतील, असे विखे म्हणाले.

ठाकरेंनी पाहिलेल्या स्वप्नाचे शिंदे-फडणवीसांकडून भूमिपूजन; मुंबईतच होणार व्यंकटेशाचे दर्शन

दरम्यान, नगर दक्षिणच्या जागेवरुन काही दिवसांपूर्वी भाजपचे राम शिंदे यांनी पक्षाने आदेश दिल्यास आपण ही लढवू असे वक्तव्य केले होते. तसेच गेल्या काही काळापासून भाजपमध्ये राम शिंदे विरुद्ध विखे कुटूंब असा संघर्ष पहायला मिळतो आहे. तसेच विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष सगळ्या राज्याला माहिती आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात हे जर नगर दक्षिण मधून रिंगणात उतरले तर या निवडणुकीत मोठी चुरश पहायला मिळू शकते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube