ठाकरेंनी पाहिलेल्या स्वप्नाचे शिंदे-फडणवीसांकडून भूमिपूजन; मुंबईतच होणार व्यंकटेशाचे दर्शन
Tirumala Tirupati Balaji Temple :
देशातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर ट्रस्ट म्हणून ओळखले जाणाऱ्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराची (Tirumala Tirupati Balaji Temple) प्रतिकृती आता मुंबईतही होणार आहे. नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानला जागा भाडेतत्वार देण्यात आली होती. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या मंदिराचे भूमिपूजन झाले. (Bhoomipujan of Tirumala Tirupati Balaji Temple in Navi Mumbai by Chief Minister Eknath Shinde)
दोन वर्षांपूर्वी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली होती. या यादीत देशभरातून २४ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना नवी मुंबईत प्रति बालाजी मंदिर उभारणीसाठी जमीन देण्याचा निर्णय झाला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतः या मंदिराच्या जागेसाठी आणि बांधकामासाठी पुढाकार घेतला होता.
‘डबल इंजिन सरकार बैलगाडीपेक्षा हळू; तेलपाणी करायला दिल्लीतील सर्व्हिसिंग स्टेशनला जावं लागते’
तिरुमाला तिरुपती देवस्थान मंडळाने देशातील हैदराबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगलोर, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र आणि ऋषिकेश येथे शहरस्तरीय सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराच्या मंदिरांची स्थापना केली आहे. त्याच धर्तीवर तिरुमला तिरुपती देवस्थानने नवी मुंबईत मंदिर उभारणीसाठी जमीन देण्याची मागणी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारकडे केली होती. दरम्यान, एप्रिल 2022 मध्ये महाराष्ट्रा सरकारेन 10 एकर जमिनीचा भूखंड TTD ला दिला. या जमिनीची किंमत 500 कोटी रुपये आहे.
Sujay Vikhe : समनापूरमधील दगडफेक पूर्वनियोजित; खा. विखेंचा दावा
त्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानला ठाकरे सरकारने जमीन दिली. आता या जागेवर प्रति मंदिर होत असून आज त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणीवस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही सर्व भाग्यवान आहोत की आम्ही तिरुपती बालाजी देवस्थानला या ठिकाणी 10 एकर जमीन दिली आहे. तिरुपती हे बालाजीचे मंदिर आहे मुंबईत होतेय, ही आनंदाची बाब आहे. अनेकांना तिरुपतीला जायचे असतं, मात्र, प्रत्येकाला तिकडे जाणं शक्य होत नाही. आता सर्वांना या ठिकाणी बालाजीचे दर्शन घेता येईल, असं शिंदे म्हणाले.