Nitesh Rane : संजय राऊतच्या मालकानेच मराठा आरक्षण घालवलं; राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane : संजय राऊतच्या मालकानेच मराठा आरक्षण घालवलं; राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane Criticized Uddhav Thackeray : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी सरकारची कोंडी केलेली असताना भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टार्गेट केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. संजय राऊताच्या मालकानेच मराठ्यांचं आरक्षण घालवलं. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले हे त्रिवार सत्य आहे, असा घणाघाती आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. आ. राणे आज भाजप आमदार प्रकाश भोयर यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त वर्ध्यात आले होते. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नागपूरमध्ये दिवाळीपूर्वीच फुटणार फटाके; RSS च्या बालेकिल्ल्यात होणार ‘इंडिया’चे शक्तिप्रदर्शन 

राणे पुढे म्हणाले, मराठा समाजाचे आरक्षण उद्धव ठाकरे यांच्यामुळेच गेले आहे. ज्यावेळी संजय राऊत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेण्यासाठी उपोषणस्थळी गेले होते तिथे त्यांना बोलू सुद्धा दिले नाही. त्यांच्या मुखपत्रात राऊतच्या मालकाच्या आदेशाने मराठा क्रांती मोर्चाला मुका मोर्चाचे कार्टुनही छापले गेले होते. त्यामुळे या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार त्यांना राहिलेला नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर ओबीसी समाजाकडून आंदोलनाची भाषा होऊ लागली आहे, असे विचारले असता राणे म्हणाले, मराठा आरणक्षणसाह ओबीसी, धनगर आरक्षणाच्याबाबतीत आमचं सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे त्यांनी अन्य गोष्टींकडे लक्ष देऊ नये. सरकारवर विश्वास ठेवावा, असे आवाहन आ. राणे (Nitesh Rane) यांनी केले.

उद्धव ठाकरेंची सगळी कुंडली आमच्याकडे

उद्धव ठाकरे ठाकरे जितकी खालची पातळी गाठून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतील. त्यापेक्षा खालच्या पातळीवर जाऊन आम्ही टीका करू. उद्धव ठाकरेला दिवसा तारे दाखवण्याची तयारी आमची आहे. 39 वर्ष उद्धव ठाकरे सोबत राहिल्याने त्यांची संपूर्ण कुंडली आम्हाला माहिती आहे. सगळं माहिती आहे. जास्त बडबड करू नये, अशी टीका राणे (Nitesh Rane) यांनी केली.

Sanjay Raut : राहुल नार्वेकरांनी कायदा अन् घटनेशी द्रोह केला; आमदार अपात्रतेवरून राऊतांचा घणाघात 

डीएमकेचा इंडिया बैठकीत अभिनंदनाचा ठराव

सनातन धर्मावर टीका करणाऱ्या डीएमकेच्या अभिनंदनचा प्रस्ताव विरोधी पक्षाच्या बैठकीत घेतला गेला. हे सनातन धर्मावर टीका करणाऱ्या लोकांच्या अभिनंदनाचे प्रस्ताव होणार असतील तर इंडिया आघाडी कशासाठी बनली आहे हे आता स्पष्ट होत आहे. हे सनातन धर्माविरोधात लढण्यासाठीच आघाडी तयार केली आहे, अशी टीका राणे यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube