संजय राऊत यांच्या समोर आता भाजपचे राणे अस्र

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 04 26 At 7.48.31 PM

BJP’s Rane Faces Sanjay Raut Every Day Now : उद्भव बाळासहहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत याच्या आरोपाना उत्तर देत शिंदे गट आणि भाजपाने हात टेकले अहेत. रोज होणाऱ्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी मोठ्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुले, प्रवोण दरेकर, चंद्रकांत पाटिल आणि गिरीश महाजन आशिष शेलार अशी मोठ्या नेत्यांची शक्ती खर्च करावी लागत असे.

सकाळी होणारी संजय राऊत यांची पत्रकार परिषद आता दिवसातून अनेक वेळा देखील होऊ लागली आहे याला प्रत्युत्तर देणे या नेत्याना शक्य नाही. म्हणून राऊत यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून आमदार नितेश राणे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजप महाराष्ट्राची माती करायला निघालंय, संजय राऊतांचे टीकास्त्र

संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर रोज नितेश राणे यांची प्रत्युत्तर पत्रकार परिषद होणार गुरुवार 27 एप्रिल पासून सकाळी 10 वाजता नितेश राणे यांची सिंधुदुर्ग येथे प्रत्युत्तर पत्रकार परिषद घेणार आहे. संजय राऊत बोलल्या नंतर लगेचच ही पत्रकार परिषद रोज होईल. असे भाजपने सांगितले आहे.

Tags

follow us