महाविकास आघाडीला ढील पडणे हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; बावनकुळेंची टीका

महाविकास आघाडीला ढील पडणे हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; बावनकुळेंची टीका

Chandrashekhar Bawankule ON Uddhav Thackeray : काल शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राजकीय निवृत्ती घेण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. कार्यकर्त्यांना आंदोलनही केलं. मात्र, पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळं अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले. दरम्यान, आता नेते-कार्यकर्ते पवारांनी निवृत्त होऊ नये असा आग्रह करत आहेत. पवारांच्या या निर्णयावर अनेक पतिक्रिया येत आहेत. पवारांच्या या निर्णयाचा महाविकास आघाडीवर मोठा परिमाण होणार असल्याचं बोलल्या जातं. दरम्यान, याच मुद्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) ठाकरे गटाचे प्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या उध्दव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली.

बावनकुळेंनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेत भाजपच्या नव्या कार्यकारणीची घोषणा केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर भाष्य करत ठाकरेंचा समाचार घेतला. ते म्हणाले की, पुण्यातील वज्रमुठ सभा होणार नाही, अशी कुजबूज सुरू आहे. महाविकास आघाडीला तडे गेलेत. पवारांनी जन्माला घातलेल्या महाविकास आघाडीत ऐक्य नसल्याचं दिसतं. नेते एकमेकांवरच कुरघोडी करत आहेत. वज्रमुठेला तडे गेले जात आहेत. महाविकास आघाडीलाही ढिली पडली आहे. महाविकास आघाडीत होत असलेल्या उलथापथी ह्या महाविकास आघाडी ज्या नेतृत्वाच्या हातात आहे, त्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह आहेत, असं म्हणतं उध्दव ठाकरेंवर टीका केली.

भाजपची कार्यकारिणी जाहीर; पश्चिम महाराष्ट्राला सहा तर विदर्भ-मराठवाडा प्रत्येकी तीन उपाध्यक्ष

बावनकुळे म्हणाले, उध्दव ठाकरे हे मविआचं नेतृत्व करत आहे. पण, ठाकरेंच्याच पक्षातल्या लोकांनी त्यांच्याविरोधात बंड करून वेगळा मार्ग निवडला. त्यांच्याच नेत्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नव्हता. ठाकरेंना त्यांच्याच पक्षाचं चांगलं नेतृत्व करता आलं नाही. मग ते कॉंग्रेस – राष्ट्रवादीचं नेतृत्व काय करतील, असा खोचक टोला लगावत
महाविकास आघाडीचं नेतृत्व करण्यात उद्धव ठाकरे कमी पडले, मुंबईच्या सभेत लोक व्यासपीठावरील नेतेही त्यांचे भाषण ऐकत नव्हते, असं बावनकुळेंनी सांगितलं.

पवारांनी घेतलेल्या राजकीय संन्यासाविषयी बोलतांना बावनकुळे यांनी सांगितलं की, शरद पवारांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेणं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. तोपवारांनी आजवर जे काम केलं, त्यामुळं लोकांमध्ये पवारांविषयी आदर आहे. त्यामुळं कार्यकर्ते त्यांच्या निर्णयाला विरोध करत आहेत. मात्र, त्यांनी सांगितलं की,
नेतृत्व न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, मी पक्षासोबत आणि राष्ट्रवादी असेल. माझं मार्गदर्शन असेल, असं पवारांनी सांगितलं. त्यामुळं कार्यकर्त्यांनी भावनिक होण्याची गरज नाही, असं बावनकुळेंनी सांगितलं.

दरम्यान, आमच्याकडे राष्ट्रवादीचं अद्याप कुणी आलं नाही. कुणी पक्षप्रवेशासाठी विचारलं नाही. पण, आमचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे आहेत. जे पक्षात येतील, त्यांना पक्षात प्रवेश देऊ, असं सुचक वक्तव्यही त्यांनी केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube