Chinchwad Byelection : राहुल कलाटे यांच्यामुळे नानांच्या विजयात काटे

Chinchwad Byelection : राहुल कलाटे यांच्यामुळे नानांच्या विजयात काटे

पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या चिंचवड विधानसभेच्या (Chinchwad Byelection) निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत होत असून सध्या भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आघाडीवर दिसत आहेत. आठव्या फेरीअखेर जगताप आघाडीवर असून त्या एकूण 5 हजार 17 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना एकूण 28 हजार 727 मते मिळाली आहेत. राहुल कलाटे (Rahul Kalate) आणि नाना काटे (Nana kate) यांच्यातील मतविभागणीचा फायदा त्यांना मिळाला आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार कलाटे यांच्यामुळे काटे यांच्या मार्गात काटे दिसत आहेत.

कारण , आतापर्यंत कलाटे यांना 10 हजार 048 तर काटे यांना 23 हजार 710 मते मिळाली  आहेत. या दोघांच्या मतांची बेरीज केली तर ही मते जगताप यांच्या मतांपेक्षा जास्त आहेत. महाविकास आघाडीतील बंडखोरी काटेंसाठी अडचणीची ठरल्याचे सध्या तरी दिसत आहे.

वाचा :  Kasba-Chinchwad By Election : पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच विजयाचे बॅनर झळकले

गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. भाजप उमेदवार जगताप या सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, या मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली. कलाटे यांना तिकीट नाकारल्याने ते अपक्ष म्हणून उभे राहिले. या बंडखोरीचा फायदा भाजपला मिळताना दिसत आहे. दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे.

मतमोजणीत या गोष्टींचा परिणाम दिसून येत आहे. जगताप यांना सहानुभूती तर आहेच. मात्र, त्याहीपेक्षा काटे आणि कलाटे यांच्यातील मतविभागणीचा त्यांना जास्त फायदा होत असल्याचे दिसत आहे. जगताप या आठव्या फेरीअखेर 5 हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. तर अपक्ष उमेदवार कलाटे यांनी दहा हजार मतांचा टप्पा पार केला आहे.

कलाटे यांना आठव्या फेरीअखेर 10 हजार 48 मते मिळाली आहेत. तर नाना काटे यांना 23 हजार 710 मते मिळाली आहेत. या मतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर जगताप आणि काटे याच्या मतात फार फरक नाही. कलाटे आणि काटे यांच्या मतांची बेरीज जगताप यांच्या मतांपेक्षा जास्त आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube