शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार? एकनाथ शिंदेंनी अयोध्येत दिलं उत्तर

  • Written By: Published:
Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel

Eknath Shinde on Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदार, खासदार आणि मंत्र्यासोबत अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tour) गेले आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेत बंडखोरी केल्याचं एकनाथ शिंदे सांगतात. भविष्यात ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येणार का? या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्यात दिले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी नाही. आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे जात आहोत. जो बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता. बाळासाहेब ठाकरेंचा विचार तोंडून जे सरकार बनवलं होतं, ते आता नाही.

शिवसेना आणि भाजप नैसर्गिक युती आहे. आमची आणि भाजपची विचारधारा सारखी आहे. आधी लोकांना हिंदु म्हणायलाही भीती वाटत होती. 2014 मध्ये जेव्हा मोदींचे सरकार आले, तेव्हापासून हिंदुत्वाचा मान सन्मान केला जात आहे. ‘गर्व से कहो हम हिंदु है’ हा नारा देणारे बाळासाहेब ठाकरे होते, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

गुलाबराव पाटलांनी सांगितला, ‘1992 आणि आताच्या अयोध्या दौऱ्यातील फरक’

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने काँग्रेससोबत चर्चा केली पण कथनी आणि करनीमध्ये फरक असतो. चर्चा करुन काही होत नाही. शिवसेना आणि भाजप सावरकरांच्याबाबत रोखठोक भूमिका घेत आहे. जर हिंमत असेल तर त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधीविरोधात रस्त्यावर उतरावं, असं आव्हान शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

सर्वसामान्य शिवसैनिक कुणाच्या पाठिंशी असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. या मुद्द्यावर बोलताना शिंदे म्हणाले, ‘बघा केडर मुद्दा असेल, तर शिवसेनेचे पूर्ण केडर आमच्यासोबत आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार मानणारे लोक आहोत. काम करणारे कोण आहेत, हे कार्यकर्त्यांना माहिती आहे. जेव्हा संकट येतात, तेव्हा कोण धावून येतं हे लोकांना माहिती आहे. 2024 मध्ये भाजप आणि शिवसेना युती पूर्ण बहुमताने जिंकेल’, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube