मविआचे जागावाटप मेरिटवरच होणार, कुणाच्याही हो ला हो म्हणणार नाही; पटोलेंचा पवार-ठाकरेंना इशारा
Nana Patole : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या संदर्भात मॅरेथॉन बैठका पार पडत आहेत. मात्र, अद्यापही जागावाटपाचा तिढा सुटला नाही. दरम्यान, आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) जागावाटपाबाबत मोठं विधान करत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना इशारा दिला.
साताऱ्यात अजित पवारांचे शक्तिप्रदर्शन, विरोधकांचा घेतला समाचार
शरद पवार, उद्धव ठाकरेंविषयी आदर आहेतच, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही सर्वच बाबतीत त्यांच्या हो ला हो म्हणू. मविआचे जागावाटप हे मेरिटवरच व्हायलं हवं, अशी भूमिका पटोलेंनी घेतली.
मेरिटच्या आधारावर जागावाटप व्हावं…
नाना पटोलेंनी आज एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना महाविकास आघाडीचे जागावाटप काँग्रेसच्या मनासारखं होत आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आमची भूमिका अतिशय साधी आणि सरळ आहे. आम्हाला जास्त जागा पाहिजेत असं नाही. मात्र, मेरिटच्या आधारावर जागावाटपाचा निर्णय व्हावा, असं आमचं मत आहेत. जेणेकरून महाराष्ट्राला विकणारं सरकार सत्तेतून बाहेर काढता येईल, असं पटोले म्हणाले.
गुजरातधार्जिणे, शिवद्रोही सरकारला सत्तेत
यावेळी बोलतांना पटोलेंनी महायुती सरकावर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर गेले आणि आता तिथंही कर्ज करून आले. तेथील एका कंपनीने यांना हॉटेल्स आणि जेवणाचे पैसे पाठवा अशी नोटीस बजाजली. हे जिथं जातात, तिथं कर्ज करून येतात. आता बुधवारी सरकारने निर्णय घेतला आणि 30,000 कोटी रुपयांचा ओव्हरड्राफ्ट केला. म्हणजे आता सरकारला कर्मचाऱ्यांचे पगारही कर्जातून करावे लागणार आहेत. हे असं गुजरातधार्जिणे सरकार, शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही सरकारला सत्तेवरून हटवण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे. त्यामुळे हे सरकार घालवण्यासाठी जागावाटप मेरीटच्या आधारावर व्हावं, अशी आमची भूमिका असल्याचं पटोले म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसलाही सहानुभूतीचा फायदा झाला, त्यामुळे काँग्रेसने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना गृहीत धरू नये, असं त्यांच्या पक्षाच्या नेत्याचं म्हणण आहे. यावर कॉंग्रेसची भूमिका काय? असा सवाल पटोलेंना विचारला असता ते म्हणाले की, आम्ही मान-सन्मानच देत आहोत. ज्या भाजपने यांची घरं फोडली, यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, त्यांना सत्तेतून बाहेर फेकण्याचा काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळं भाजपला सत्तेतून बाहेर काढायचं असेल तर मेरिटवर निर्णय घ्यावाला आणि या नेत्यांचा सन्मानही त्यातच आहेत.
शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. उद्धव ठाकरेही आमच्यासाठी आदरणीय आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही सर्वच बाबतीत त्यांच्या हो ला हो म्हणू. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप हे मेरिटवरच व्हायलं हवं, अशी भूमिका पटोलेंनी घेतली.