Devendra Fadnavis: 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री, लोकसभेच्या जागांबाबत फडणवीसांचे मोठे विधान

  • Written By: Published:
Devendra Fadnavis: 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री, लोकसभेच्या जागांबाबत फडणवीसांचे मोठे विधान

Devendra Fadnavis on Eknath Shinde : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार आहे. मुख्यमंत्री अजित पवार हे होणार आहेत, अशा राजकीय चर्चा सुरू आहेत. या सर्व चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये पूर्णविराम दिला आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले आहेत.तेथे एका वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पूर्णपणे स्थिर असल्याचे सांगितले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहणार आहेत.त्यांच्या नेतृत्वाखालीच 2024च्या निवडणुका लढवू आणि जिंकू, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे खरी शिवसेना आमच्याबरोबर आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही वेगळा काही निर्णय लागेल असे वाटत नाही, असा दावाही फडणवीस यांनी केलाय.

शिंदे आमच्याबरोबर आल्याने आम्हाला कुठलाही फटका येत्या निवडणुकांमध्ये बसणार नाही. विधानसभा असो की लोकसभा आम्हाला बहुमत मिळेल. आमचे 23 खासदार आहेत. त्यापेक्षा जास्तच खासदार 2024 ला निवडूण येतील. आमच्याबरोबर असलेल्या शिवसेनेला त्यांच्या पूर्वीच्या पूर्ण जागा दिल्या जातील, असे फडणवीस म्हणाले आहे.

शिंदे हे बरोबर आल्याने भाजपला फायदा होणार नाही, असे चुकीचे महाविकास आघाडी पसरवत आहे. राष्ट्रवादीत काय चालले हे मला माहित नाही. मी राष्ट्रवादी, अजित पवार यांचा प्रवक्ता नाही, असे फडणवीस म्हणाले. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मी काही बोलत नाही. मी बोलले तर वेगळ्यात बातम्या सुरू होतात, असेही फडणवीस म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube