महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजपात नेण्यासाठी ईडीचे छापे – महेश तपासे
मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी आणि महाविकास आघाडी कमकुवत करण्यासाठी भाजपकडून ईडीचे छापे टाकले जात आहेत. तर एकीकडे राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे संचालक भारतात मुस्लिमांना घाबरण्याचे कारण नाही. असं म्हणतात पण २४ तासांत मुस्लिम नेते हसन मुश्रीफांवर ईडीचे छापे टाकतात.
राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे संचालक यांनी एका कार्यक्रमात यांनी भारतात मुस्लिमांना घाबरण्याचे कारण नाही, असे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर अवघ्या २४ तासातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुणे आणि कोल्हापुरात ईडी छापे टाकले. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि मुलींच्या घरावर सरसेनापती संताजी घोरपडे या माझ्या मुलांच्या कारखान्यावर आणि पुण्यातील काही लोकांच्या घरावर घरावर आज सकाळी ईडीने छापा टाकलाय. मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही होते. ईडीचे जवळपास 20 अधिकारी आज सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले होते.
भाजपचे काही नेते भविष्यात ईडीच्या छाप्यांबाबत माध्यमातून वक्तव्य करतात आणि तसेच घडते हे विडंबनात्मक नाही का? असा सवाल महेश तपासे यांनी केला आहे. शिंदे – फडणवीस सरकारच्या पाठीशी असलेल्या आमदार – खासदारांवरील सर्व आरोपांचे काय झाले? भाजपने या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ईडी, आयटीने तपास बंद करून त्यांना निर्दोष सोडले आहे का? असा सवाल महेश तपासे यांनी भाजपला केला आहे.