फडणवीस यांच्यासोबत पदाची अदलाबदल, म्हणून एकनाथ शिंदे नाराज; ‘त्या’ ट्विटमुळे मोठ्या चर्चा

  • Written By: Published:
फडणवीस यांच्यासोबत पदाची अदलाबदल, म्हणून एकनाथ शिंदे नाराज; ‘त्या’ ट्विटमुळे मोठ्या चर्चा

राज्याच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit Pawar) पक्षाच्या आमदारांसह भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा होत्या. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पदावरून हटविण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आज शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर निघून गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि प्रवक्ते क्लाईड क्रास्ट्रो यांनी एक ट्वीट करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. क्लाईड क्रास्ट्रो यांनी एक ट्वीट करून म्हटले की, “हे पण खरं आहे का? एकनाथ शिंदे यांनी कामावरून तीन दिवसांची सुट्टी घेतल्याची बातमी आहे. मीडियातील सूत्रांचे म्हणणे आहे की, त्यांनी नाराज होऊन सुट्टी घेतली आहे कारण भाजपची इच्छा आहे की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये आपल्या पदाची अदलाबदल करावी.

तेलही गेलंय, तुपही गेलंय अन् दुपट्टा आलायं, नरेश म्हस्केंची थेट ठाकरेंवर खरमरीत टीका

नाराजीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात…

या घडामोडींवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्यातील घडामोडींबाबत प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, तुम्ही संजय राऊतांना भेटलात वाटतं अशा मोजक्याच शब्दांत उत्तर देत हा विषय त्यांनी संपवला.

भावी मुख्यमंत्री ! सासरवाडीत झळकले अजित पवारांचे बॅनर

एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत. त्यांच्या गावची जत्रा आहे. ते गावच्या जत्रेला गेले आहेत. जत्रेला गेल्यानंतरही ते नाराज आहेत असे कुणी म्हणत असेल तर त्याचा सत्कार त्या जत्रेत केला पाहिजे, असे सामंत म्हणाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube