स्वत:च्या डोळ्यातील मुसळ…. बावनकुळेंना अरविंद सावंतांचा टोला

स्वत:च्या डोळ्यातील मुसळ…. बावनकुळेंना अरविंद सावंतांचा टोला

नाशिक : चंद्रशेखर बावकुळेंना दुसऱ्याच्या डोळ्यातली कुसळ दिसते, पण स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नसल्याचा खोचक टोला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला अवमान बावनकुळेंना दिसत नसल्याने ते कुसळ शोधण्यात व्यस्त आहेत. आता त्यांनी औरंगजेबजी मैं आया हुं म्हणत तिकडं जाऊन नतमस्तक व्हावं, असंही ते म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावरही त्यांनी ताशेरे ओढले आहेत. शिंदे गट म्हणजे विनाशकाली विपरीत बुध्दी, असा उल्लेख त्यांनी शिंदे गटाला उद्देशून केला आहे.

सत्व आणि तत्व न सोडण्याची आम्हांला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच विकाऊ माणसांबद्दल काय बोलावं असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरे उभ्या महाराष्ट्रात फिरणार असून त्यांनी बुलढाण्यात सभा घेतली, आता त्यांची नाशिकमध्ये सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. या लोकांनी उद्धव साहेबांना जी वागणूक दिली, त्याबद्दल प्रचंड चीड जनतेच्या मनात आहे. ती मताच्या रुपाने बाहेर पडेल, असं सावंत म्हणालेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube