Nitin Gadkari : तब्बल नऊ वर्षांत पहिल्यांदाच गडकरी सहकुटुंब PM मोदींच्या भेटीला

  • Written By: Published:
Gadkari family meets Modi

Gadkari family meets Modi : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज त्यांच्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी नऊ वर्षांत पहिल्यांदाच सौहार्दपूर्ण भेट घेतली. गडकरीजींसोबत त्यांच्या पत्नी कांचनताई, (Kanchantai) मुलगा सारंग, (Sarang) सून मधुरा गडकरी ( Madhura Gadkari) आणि नातू निनाद (Ninad) व अर्जुन (Arjun)  होते. गेल्या नऊ वर्षात गडकरी यांची कुटुंबासह मोदी यांच्यासोबत पहिली भेट आहे. यावेळी मोदींनी गडकरींच्या कुटूंबीयांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. (For the first time in almost nine years, the Gadkari family meets Modi)

भाजपचे नेते आणि भाजपचे खासदार यांच्या कुटुंबांना मोदी हे अधून मधून भेटत असतात. हे फोटो खासदार मंडळी आवर्जून सोशल मीडियात शेअर करत असतात. संसदेच्या अधिवेशनाच्या काळात मोदी हे खासदारांना भेटण्याचा नेहमीचा शिरस्ता असतो त्यांच्या कार्यालयात बोलवून मोदी हे खासदारांची मुले नातवंडे यांच्याशी संवाद साधताना चे फोटो अनेकदा व्हायरल होतात.

पण नितीन गडकरी यांची कुटुंबीयांसह मोदी यांची भेट नऊ वर्षात पहिल्यांदाच झाली आहे. मोदी आणि गडकरी यांच्यातील संबंध याबाबत नेहमी चर्चा होत असते.

Tags

follow us