एकनाथ खडसेंना नसते धंदे कुणी सांगितले? मंत्री गिरीश महाजनांनी सुनावले !

  • Written By: Published:
एकनाथ खडसेंना नसते धंदे कुणी सांगितले? मंत्री गिरीश महाजनांनी सुनावले !

Girish Mahajan : उद्धव ठाकरे यांनीच भाजपबरोबरची युती तोडल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत केला होता. परंतु राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी हा दावा खोडून काढला. नरेंद्र मोदी यांनी अर्धसत्य सांगितले असल्याचा आरोप केला होता. त्याला आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उत्तर दिले आहे. (Girish-Mahajan-reaction-on-Eknath-Khadse)

एकनाथ खडसे हे आमच्याबरोबर होते. आता ते बाहेर गेले. ते आता वाटेल तसे बोलत आहेत. खरे म्हणजे मी जागा वाटपाचा साक्षीदार होतो, असा दावा आता महाजनांनी केला. 2014 मध्ये उद्धव ठाकरे यांनी हट्ट धरला की आम्हाला 151 जागा दिल्या पाहिजे. त्यांची तशी परिस्थिती नव्हती. शेवटी एका जागेवर तडजोड करू शकले नाही. वेगळे लढून 123 जागा भाजपच्या निवडून आल्या. पण त्यांच्या 61 जागाच निवडून आल्या. त्यावेळी परिस्थिती नसतानाही ठाकरे यांनी जास्त जागांचा आग्रह धरला. त्यामुळे युती तुटल्याचा दावा महाजन यांनी केला आहे.


‘सोनियाजी, राहुल यांचं लग्न करा, मा का लाडला बिगड गया’; फ्लाइंग किसवरून चित्रा वाघांची टीका>

एकनाथ खडसे यांनी सुनाविताना महाजन म्हणाले, आता खडसेंची विश्वासार्हता काय आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. त्यांच्या म्हणाल्या काहीच आधार नाही. तुम्हाला कुणी सांगितले नसते ते धंदे करायला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे खडसे चुकीच्या गोष्टी सांगत आहेत. त्यांनी शेखी मिरवू नये, असा टोलाही महाजन यांनी लगावला आहे.

‘…अन्यथा मंत्रालयातील कृषी सचिवांच्या दालनात साप सोडू’; बच्चू कडूंचा इशारा

2019 मध्ये भाजप-शिवसेना एकत्र लढल्यानंतर आमच्या 105 जागा निवडून आल्या. त्यांचा 55 जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे ठाकरेंची किती ताकद आहे हे दिसून आली आहे. त्यानंतर लगेच तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जावून सत्ता मिळविली आहे. या गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत. आता घोडा मैदानसमोरच असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube