Kiran Pawaskar म्हणाले, संजय राऊत मानसिकदृष्ट्या आजारी

Kiran Pawaskar म्हणाले, संजय राऊत मानसिकदृष्ट्या आजारी

मुंबई : शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray Group)गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यावर शिंदे गटाचे (Shinde Group)नेते किरण पावसकर (Kiran Pawaskar)यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत हे मानसिकदृष्ट्या आजारी आहेत, जे सकाळी बोलतात ते संध्याकाळीही बोलू लागले आहेत, त्यांच्या आजारपणावर थोडाफार काहीतरी उपचार झाला तर चांगलंच आहे, असा पलटवार किरण पावसकर यांनी केलाय.

पावसकर म्हणाले की, ज्यांचा सत्कार कोळी बांधवांना करायचा होता, ते सत्कारमूर्ती आले होते, कार्यक्रम चांगला झाला आहे. कोळी बांधवांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केल्याचं पाहून मातोश्रीला बाण लागलाय. त्याठिकाणी जेवढी अपेक्षित गर्दी होती, तेवढी गर्दी झाली होती, त्यामुळं मोकळ्या खुर्च्या गोळा करण्याची गरज पडली नाही, त्या खुर्च्या आणलेल्या होत्या, जेणेकरुन गरज पडल्यास त्या खुर्च्या वापरता येतील. त्यामुळं खुर्च्या उचलून ठेवल्या नाहीत.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. कोळी बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असाच एक व्हिडीओ शेअर करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. त्यावरुन शिंदे गटाचे नेते पावसकर यांनी संजय राऊतांवर प्रत्युत्तर दिलंय.

याठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असते तर आणखी गर्दी वाढली असती असंही यावेळी पावसकर म्हणाले, त्यामुळं भाजपचे इतर नेते याठिकाणी उपस्थित होते, याठिकाणी ग्राऊंड संपूर्ण भरलं असतं तरी तुम्हाला हेच फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळाले असते अशी टीका शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube