औरंगजेब या मातीतील नाही का ? ; प्रकाश आंबेडकरांचा सवाल..

औरंगजेब या मातीतील नाही का ? ; प्रकाश आंबेडकरांचा सवाल..

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी कार्यालयसमोर साखळी उपोषण करण्यात आले. या आंदोलनात काही तरुण हातात औरंगजेबाचे होर्डिंग घेऊन दाखल झाले आणि त्यांनी जोरदार घोषणबाजी केली. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की औरंगजेब या मातीतले नाही का, ब्रिटीशांच्या आधी येथे मुघल साम्राज्य होते. ते येथे आले अनेक वर्षे येथेच होते. त्यामुळे तो फोटो असल्याने मला काही नवीन वाटत नाही, असे अॅड. आंबेडकर म्हणाले.

महाविकास आघाडी (MVA) आगामी काळातील निवडणुका एकत्र लढण्याच्या दिशेने विचार करत आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या वक्तव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, की घोडा मैदान येईल, त्यावेळी काय परिस्थिती आहे ते समोर येईल.

वाचा : प्रकाश आंबेडकरांचा थेट आरएसएसच्या मुळावरच घाव, कार्यप्रणालीवर स्पष्टच बोलले

उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने युती केली असली तरी अद्याप वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. याबाबतच शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पवार यांनी मला याबाबत काही माहिती नाही, असे उत्तर दिले होते. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले, की घोडा मैदान येईल त्यावेळी काय परिस्थिती आहे ते देखील कळेल असे एकाच वाक्यात उत्तर दिले.

..तर प्रकाश आंबेडकरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? स्वबळावर लढण्याचा इशारा

कसबा पोटनिवडणुकीबाबत ते म्हणाले, की आधीच्या निवडणुकीत भाजपला किती मते मिळाली आणि आताच्या निवडणुकीत किती मिळाला. या मतांत कुठेही घट झालेली मला दिसत नाही. भाजपची मते कमी झालेली दिसत नाहीत.

धंगेकरांनी बांधणी चांगली केल्याने मागच्या वेळची साडेतीन हजार मतांची कमतरता त्यांनी यावेळी भरून काढली. लीड कायम केली हा एक बदल दिसला आहे. हा विजय धंगेकरांचा असल्याचे मी मानतो. पक्षाने देखील आता हे मान्य करावे, असे अॅड.आंबेडकर म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube