Mahrashtra Politics : हिंदुत्ववादी पक्षाबरोबर गेलो हे बरोबरच…

  • Written By: Published:
Mahrashtra Politics : हिंदुत्ववादी पक्षाबरोबर गेलो हे बरोबरच…

साताराः पूर्वी समविचारी पक्षांशी युती होत होती. आता परस्परविरोधी विचारधारेच्या पक्षांशी युती होऊन सत्तेत वाटा मिळविता येऊ शकतो. राजकीय कार्यकर्त्यांला कोणीही शत्रू नसतो. हे समजून घेतले पाहिजे. त्यासोबत आज हिंदुत्ववादाने (Hindutav) ढवळून निघालेले राजकारण रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे, असे आवाहन आज प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत डॉ.शरणकुमार लिंबाळे (Dr.sharankumar limbale) यांनी केले आहे.

महाबळेश्वर येथे हॉटेल ब्ल्यू पार्कमध्ये आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या एक दिवसीय अभ्यास शिबिरात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते.

मागील दोनशे वर्षांत परिवर्तन चळवळीने जातिवादी धर्मांधशक्तींना शिव्यांची लाखोली वाहिली आहे. आता देशाचे राजकारण बदलत आहे. त्यांची वैचारिक भूमिका वेगळी म्हणून त्यांच्याशी युती नको हा जुनाट आणि चुकीचा विचार झाला. आता बदलत्या राजकारणात आपण सत्तेत वाटा देईल त्यांच्या सोबत गेले पाहिजे, असे लिंबाळे म्हणाले.

भाजपसोबत आपण आहोत. त्यात काही चूक नाही. आपली भूमिका जनतेत कार्यकर्त्यांनी मांडली पाहिजे. प्रतिवाद केला पाहिजे आणि सोशल मीडियातील टोलर्सला ठोकले पाहिजे. अनेक लोक समाजकार्यात नसतात काहीच त्यांचा समाजसेवेशी संबंध नसतो. केवळ नोकरी करून भरल्यापोटी ते सोशल मीडियात नकारात्मक विचार मांडत असतात अशा टोलर्सला वैचारिक ठोकले पाहिजे, असे आवाहन डॉ शरणकुमार लिंबाळे यांनी केले.
 
दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात विचारवंत साहित्यिकांनी भारतीय दलित पँथरला अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र दलित पँथर ही केवळ मुंबईपर्यंत सीमित आणि केवळ 2 वर्ष टिकलेली चळवळ होती. मात्र भारतीय दलित पँथर हे देशभर गावागावात पोहीचलेली आणि 20 वर्ष टिकलेली चळवळ होती. भारतीय दलित पँथरने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा लढला; रिडल्स; गायरान  जमिनीचे प्रश्न;झोपदपट्टीचे प्रश्न;दलित अत्याचाराचे प्रश्न असे अनेक आंदोलने केली. जगात सर्वात जास्त आंदोलन मोर्चे काढणारे नेते कोण असेल तर ते रामदास आठवले आहेत, असे लिंबाळे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube