आरक्षण पद्धतीत चक्राकार पद्धत पाळली नाही…आरक्षण सोडतीवर उद्धव ठाकरे गटाचा आक्षेप
महापौरपदाच्या आरक्षण सोडतीवर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप नोंदवला आहे.
राज्यातील 29 महापालिकेतील महापौर पदासाठी आरक्षण सोडत आज नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या आरक्षण सोडतीत मुंबईसाठी चक्राकार पद्धत पाळली जात नसल्याचा आक्षेप ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नोंदवला आहे. मंत्रालयातील परिषद सभागृहात पार पडलेल्या या सोडतीदरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्यांकडून गोंधळ घातला गेल्याचंही समोर आलंय.
याबाबत बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आरक्षण सोडतीत चक्राकार पद्धत होती तर मुंबई किमान ओबीसी द्यायला हवं होतं. पण जाणून बुजून ठरवून केलेली ही लॉटरी आहे. या आरक्षण सोडतीचा आम्ही धिक्कार करतो मुंबई आरक्षण पद्धतीत चक्राकार पद्धत पाळली जात नसल्याचा आक्षेप असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलंय.
‘अंतराळातून पृथ्वीवरील वाद क्षुल्लक वाटतात’; अंतराळवीर सुनिता विल्यम्स ‘नासा’तून निवृत्त…
कोणत्या महापालिकेत कोणता महापौर?
1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण
2. नवी मुंबई: सर्वसाधारण (महिला)
3. वसई- विरार: सर्वसाधारण
4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
5. कोल्हापूर: ओबीसी
6. नागपूर: सर्वसाधारण (महिला)
7. बृहन्मुंबई: सर्वसाधारण (महिला)
8. सोलापूर: सर्वसाधारण
9. अमरावती: सर्वसाधारण
10. अकोला: ओबीसी (महिला)
11. नाशिक: सर्वसाधारण (महिला)
12. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण (महिला)
13. पुणे: सर्वसाधारण (महिला)
14. उल्हासनगर: ओबीसी
15. ठाणे: अनुसूचित जाती
16. चंद्रपूर: ओबीसी (महिला)
17. परभणी: सर्वसाधारण (महिला ) (आक्षेप)
18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )
19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण (महिला)
20. मालेगाव: सर्वसाधारण
21. पनवेल: ओबीसी
22. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण (महिला)
23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण (महिला)
24. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
25. जळगाव: ओबीसी (महिला)
26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
27. धुळे: सर्वसाधारण (महिला)
28. जालना: अनसूचित जाती (महिला)
29. इचलकरंजी: ओबीसी
