तुमची बायको अमितच्या बायकोला खाष्टपणा दाखवतेय का?; पेडणेकरांकडून खरपूस समाचार

  • Written By: Published:
तुमची बायको अमितच्या बायकोला खाष्टपणा दाखवतेय का?; पेडणेकरांकडून खरपूस समाचार

Kishori Pednekar Slams Raj Thackeray : उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, अशी टीका राज ठाकरे यांनी शिवडीतील प्रचारसभेत केली होती. त्यांच्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंची वाघीणी म्हणजेच मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंचा सडकून समाचार घेतला आहे. पेडणेकर यांच्या या टीकेमुळे मतदानाच्या आदल्या दिवशी मनसेचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

वय फक्त आकडा! शरद पवारांनी मैदान गाजवलं; घेतल्या 69 जाहीर सभा अन् 3 पत्रकार परिषदा

तुमची बायको अमितच्या बायकोला…

राज ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेत पेडणेकर यांनी थेट राज यांच्या घरातील उदाहरण देत हल्लाबोल केला आहे. त्या म्हणतात की, खाष्ट सासू म्हणत परत तुम्ही एका स्त्रीलाच बदनाम केलंत, तुमची पण बायको आता एक सासूच आहे. कुठूनही फिरुन एका स्त्रीचीच बदनामी करताय, तुम्ही बदनाम करणारे कोण? असा खडा सवाल करत खाष्ट सासू म्हणजे काय? तुमच्या घरात पण असेच प्रकार घडत आहेत का? तुमची बायको अमितच्या बायकोला खाष्टपणा दाखवतेय का?, असा बोचरा सवाल किशोरी पेडणेकर यांनी राज यांना विचारला आहे.

राज्यात 15 दिवस प्रचाराचा झंझावत, कोणत्या नेत्याने किती सभा घेतल्या? वाचा सविस्तर

आम्हाला प्रेमळ सासू मिळालीये

राज ठाकरेंच्या विधानाचा कित्ता पाडत पेडणेकरांनी अनुभव असल्याशिवाय कोणीही बोलत नाही. आम्हाला खाष्ट सासू मिळाली नाही, आम्हाला प्रेमळ सासू मिळाली असल्याचेही म्हटले आहे. एवढेच काय तर, खाष्ट सासू घरात आहे, तो अनुभव घेऊन तुम्ही उद्धवजींच्या स्वभावाबद्दल बोलत असाल तर घरातूनच सुरुवात आहे, घरातच सुनेला जाच आहे असल्याचे पेडणेकरांनी म्हटले आहे. खाष्ट सासू म्हणून हिणवणं, हा स्त्रियांचाच अपमान आहे, ते पण वयस्क स्त्रियांचा अपमान आहेस, अशी खरमरीत टीकाही किशोरी पेडणेकर यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube