राऊत आणि दावनेंकडून विधानसभा अध्यक्षांवर दबाव, त्यांच्यावर कारवाई करा; नितेश राणेंची मागणी

  • Written By: Published:
राऊत आणि दावनेंकडून विधानसभा अध्यक्षांवर दबाव, त्यांच्यावर कारवाई करा; नितेश राणेंची मागणी

Nitesh Rane On Sanjay Raut : राज्यातील आमदारांच्या अपात्रतेची (Disqualification of MLAs) सुनावणी लांबणीवर पडत असल्यामुळं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर ठाकरे गटाने ते वेळाकाढूपणा करत असल्याचे आरोप केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायायाने नार्वेकरांना एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आज दुपारी तीन आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी होणार आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊत आणि दानवे सातत्याने विधाने करून विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा राणेंनी केला.

आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना राणेंनी संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, राऊत आणि दानवे सातत्याने विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर दबाव टाकत आहेत. त्यामुळं विशेषाधिकार भंगाच्या आरोपावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण विधिमंडळ सचिवाकडे पत्र लिहून केली. विधिमंडळ सचिवाने राऊत आणि दावनेंविरोधातील प्रस्ताव स्विकारावा, कारण काही दिवसांपासून हे दोघे आणि उबाठाचे अन्य नेते विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकतात, त्यांच्याविषयी अपशब्द वापरतात, या सर्व बाबी विधानसभा नियामांच्या भंग करणाऱ्या आहेत, अस राणे म्हणाले.

उर्जित पटले म्हणजे पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप; मोदींचे नाव घेत गर्ग यांचा मोठा दावा 

ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे विधिमंडळाचे सर्वसर्वा आहेत. आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय घेण्याची जबाबदारी कोर्टाने त्यांच्यावर टाकली आहे. ते याबाबत कारवाई करत आहे. मात्र, उबाठाचे हे नेते निर्णय आमच्या बाजूनेचे द्या, असं सांगत आहेत. अध्यक्षांविरोधात अनुचित दबाव व प्रभाव टाकण्यात येत आहे. हा विधानसभा अध्यक्षांचा आणि पर्यायाने विधानसेचा अधिक्षेप आहे. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. त्यामुळं लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी, असं राणे म्हणाले.

यापूर्वी राऊतांनी विधानसभेला चोर मंडळ म्हटलं आहे आणि आताही त्यांच्या सर्व हरकती, वक्तव्ये ही विधानसभा अध्यक्षांना प्रभावित करण्यासाठी केली जात असल्याचं ते म्हणाले.

आजच्या सामनातील सहकार महर्षीचे आख्यान या अग्रलेखातून गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. जे भाजपच्या गोटात जात नाही, त्यांच्या सहकारी संस्था, बॅकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून त्या मोडीत काढायच्या हे सहकारी चळवळीचे नवे मार्ग भाजप राजवटीत तयार झाल्याचं अग्रलेखात म्हटलं. यावरही राणेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, ज्यांना सहकार क्षेत्राचा स माहिती नाही, बॅंका, कारखाने राहू द्या बाजूला, ज्यांनी साधी पानटपरी देखील चालवली नाही, ते देशाच्या सहकार मंत्र्यावर लिहितात, हे हास्यास्पद आहे.

अमित शाह हे वर्षानुवर्षे सहकार क्षेत्रात काम करतात. त्यांना दांडगा अनुभव आहे. देशाच्या इतिहासात आजवर कधी झालं नाही, ते सहकार मंत्रालय भाजप सरकारने पहिल्यांदा स्थापन केलं. त्यानंतर सहकार क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले. आज आमच्यावर आरोप करणाऱ्यांच्या रक्तात संस्था डुबवणं इतकचं आहे. त्यामुळं राऊतांना शाहांवर बोलण्याचा अधिकार नाही, असंही राणे म्हणाले.

मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंनी बुडवली. प्रत्येक बाबतीत भ्रष्टाचार आणि चोरी करणारे हे लोक आहेत. राऊतांनी पत्रचाळ घोटाळ्यात अनेकांना बेघर केलं. राऊत हे चोर आहेत, ते ४२० आहे.उद्धव ठाकरेंनी स्विस बॅंकेत किती पैसे ठेवले हेही राऊतांनी अग्रलेखातून सांगावं, असा टोला राणेंनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube