उर्जित पटेल म्हणजे पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप; मोदींचे नाव घेत गर्ग यांचा मोठा दावा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (Narendra Modi) आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल (Urjit Patel) यांची तुलना सापाशी करण्यात आली होती, असा खुलासा माजी वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग (Subhash Garg) यांनी केला आहे. गर्ग यांच्या ‘वी अल्सो मेक पॉलिसी’ या पुस्तकात गर्ग यांनी हा खुलासा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. (PM Modi Compared Urjit Patel With Snake)
ठाकरेंच्या दोन वाघांशी राणेंचा थेट पंगा; संजय राऊत, अंबादास दानवेंविरोधात हक्कभंगाची नोटीस
‘गव्हर्नर उर्जित पटेल रिजाईन्स’ या प्रकरणात हा उल्लेख करण्यात आला असून, हे पुस्तक ऑक्टोबर महिन्यात प्रकाशित होणार आहे. मोदींनी सुमारे पाच वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांना पैशाच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप असे म्हटल्याचे गर्ग यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे.
गर्ग यांच्या पुस्तकात नेमकं काय?
ऑक्टोबर महिन्यात प्रकाशित होणाऱ्या गर्ग यांच्या पुस्तकात ‘गव्हर्नर उर्जित पटेल रिजाईन्स’या प्रकरणात मोदींचे नाव घेत हा गंभीर खुलासा करण्यात आला आहे. यात त्यांनी 14 सप्टेंबर 2018 रोजी पार पडलेल्या बैठकीचा संदर्भ दिला आहे. ही बैठक कठीण आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरबीआय आणि सरकार यांच्यात बोलावण्यात आली होती.
पुण्यातील मानाच्या गणपतींकडे CM शिंदेंची पाठ; दोन्ही उपमुख्यमंत्री, नीलम गोऱ्हे, सामंत यांनी घेतले दर्शन
गर्ग यांच्या पुस्तकानुसार उर्जित पटेल यांनी नरेंद्र मोदी सरकारची इलेक्टोरल बॉण्ड योजना खराब करण्याचाही प्रयत्न केला होता. यावरून केंद्र सरकार आणि पटेल यांच्यात वाद झाला होता. इलेक्टोरल बॉण्ड हे फक्त आरबीआयनेच जारी केले पाहिजे आणि तेही डिजिटल स्वरूपात असे मत पटले यांचे होते.
या बैठकीत पंतप्रधान मोदींनी आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यावर ताशेरे ओढले होते. तसेच त्यांची तुलना ‘पैशाच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या साप’ अशी केल्याचा दावा गर्ग यांनी केला आहे. विशेष म्हणजे या बैठकीला अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. त्यानंतर RBI चे 24 वे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डिसेंबर 2018 मध्ये अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा देण्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यानंतर आता गर्ग यांनी मोदींचे नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे येत्या काळात यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.