पुण्यातील मानाच्या गणपतींकडे CM शिंदेंची पाठ; दोन्ही उपमुख्यमंत्री, नीलम गोऱ्हे, सामंत यांनी घेतले दर्शन

पुण्यातील मानाच्या गणपतींकडे CM शिंदेंची पाठ; दोन्ही उपमुख्यमंत्री, नीलम गोऱ्हे, सामंत यांनी घेतले दर्शन

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गणेशोत्सवादरम्यान, मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्याकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा सध्या पुण्यात (Pune) दबक्या आवाजात सुरु आहेत. शहर शिवसेनेत (Shivsena) अंगर्तग गटबाजीने डोकं वर काढलं असून संघटनेतील अनेक तक्रारींमुळे मुख्यमंत्री वैतागले आहेत, त्यामुळेच त्यांनी हा दौरा टाळला आहे, असे कार्यकर्ते खाजगीत बोलत आहेत. (Chief Minister Eknath Shinde has not visited the revered Ganesha in Pune)

नेमकं काय घडतयं?

मागील 7 दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री उदय सामंत यांनीही पुणे दौरा करत गणेश मंडळांना भेटी दिल्या. मात्र गणेशोत्सवाच्या दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे दौरा न आखल्याने त्यांनी मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्याकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा सुरु आहेत.

ठाकरेंच्या दोन वाघांशी राणेंचा थेट पंगा; संजय राऊत, अंबादास दानवेंविरोधात हक्कभंगाची नोटीस

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले. गणेशोत्सवादरम्यान, त्यांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सवर म्हणत कार्यकर्त्यांना आणि जनतेला धुमधडाक्यात सण साजरा करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर स्वतः येऊन मानाच्या गणपतींचे आणि विविध मंडळांतील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतरच्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत ते प्रचारासाठी ठाण मांडून होते. यंदा मात्र त्यांनी पुण्याच्या मानाच्या गणपतींसाठी वेळ दिलेला नाही.

Ajit Pawar : खडसे, पडळकर ते राऊत अजितदादांनी सर्वांना घेतले फैलावर

यामागे शहर शिवसेनेत अंगर्तग गटबाजीने डोकं वर काढलं असून संघटनेतील अनेक तक्रारींमुळे मुख्यमंत्री वैतागले आहेत, त्यामुळेच त्यांनी हा दौरा टाळला आहे, असे कार्यकर्ते खाजगीत बोलत आहेत. शहरातील काही प्रमुख नेत्यांमध्ये मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर नुकताच वाद झाला होता. मुख्यमंत्रिपदाचा आणि सत्तेचा फायदा अवघे एक-दोन नेतेच मिळवत आहेत. हे नेते पक्षाच्या कार्यक्रमांना इतर नेत्यांना बोलवत नाहीत.

काही नेत्यांच्या मागे शासनाची आणि महापालिकेची यंत्रणा उभी करुनही अपेक्षित संघटना उभी राहिलेली नाही. हे नेते केवळ सत्ता उपभोगत आहेत. या आणि अशा अनेक तक्रारींमुळे एकनाथ शिंदे यांनी पुणे दौराच टाळल्या असल्याचे बोलले जात आहे. आता पुढच्या तीन दिवसात तरी ते पुण्यात येऊन ही कसर भरुन काढणार का? हे पाहणे महत्वाचे ठरते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube