Ajit Pawar : खडसे, पडळकर ते राऊत अजितदादांनी सर्वांना घेतले फैलावर
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना विविध मुद्द्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं. ते काय म्हणाले पाहुयात…
उर्जित पटले म्हणजे पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप; मोदींचे नाव घेत गर्ग यांचा मोठा दावा
राज ठाकरे, पडळकर ते राऊत अजितदादांनी घेतले फैलावर…
राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केल होत की, आपणच आपल्या मराठी मानसाला मोठं करत नाही. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता त्यावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ‘राज ठाकरे यांनी मराठी मानसाला कोण मोठं करत नाही? त्यात एखाद्याचे नाव घेतले असेल तर चर्चा करू शकतो. अन्यथा जशी व्यक्ती तसे विचार असतात.’
Shilpa Shetty: ‘सुखी’ मध्ये शिल्पाच्या अभिनयाने प्रेक्षकांना केलं थक्क
त्यानंतर अजित पवारांना (Ajit Pawar) त्यांच्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘मी कोणी ही टीका केली तर विनाश काले विपरीत बुद्धी म्हणतो आणि सोडून देतो. कोणी ही काही टीका माझ्यावर केली तरी माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत.’
>Chandramukhi 2 Hindi Trailer Out: कंगनाचा ‘चंद्रमुखी 2’ मधील रौद्रावतार पाहिलात का?
त्यानंतर आजच्या सामनातून अजित पवारांच्या (Ajit Pawar) जरंडेश्वर साखर कारखान्यातील घोटाळ्यावर भाष्य करण्यात आले. त्यावर विचारले असता ते म्हणाले, ‘सामना हे एक पक्षाचं वृत्तपत्र आहे. त्यांना काय लिहियचं ते लिहितात. मात्र त्यांच्या बातम्यावर आम्ही निरसन करण्याचं काही कारण नाही. वेगवेगळ्या यंत्रणा काम करतात. त्या तपास करतात आणि सत्य समोर येत.’ असं म्हणत त्यांनी सामनातील बातमीला उत्तर दिलं.
त्याचबरोबर त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) अमोल मिटकरींच्या माध्यमातून शरद पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की, ‘मला मध्यस्थीची गरज नाही. मी अशी कोणतीही मध्यस्थी केली नाही. मला जर संपर्क करायचा असेल तर मी तो थेट करेल.’ अशा शब्दांत त्यांनी खडसे यांना उत्तर दिलं आहे.