वन नेशन, वन इलेक्शनला मनसेचं समर्थन? राजू पाटलांनी स्पष्टच सांगितलं…

  • Written By: Published:
वन नेशन, वन इलेक्शनला मनसेचं समर्थन? राजू पाटलांनी स्पष्टच सांगितलं…

MLA Raju Patil On One Nation, One Election : देशात वर्षभर कुठं ना कुठं निवडणुका होत असतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी घेतल्या जातात. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होते. आचारसंहितेच्या काळात राष्ट्रीय विकास योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येतात, असं पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून सांगत आहे. आता त्यांनी वन नेशन, वन इलेक्शन संदर्भात राष्ट्रपदी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील MNS MLA Raju Patil) यांनी वन नेशन, वन इलेक्शनवर (One Nation, One Election) आपली भूमिका मांडली.

राजू पाटील यांनी सांगितलं की, आमच्या पक्षाचं आणि राज ठाकरेंचं नेहमीच म्हणणं असतं की, आपल्याकडे सतत निवडणूका होत असतात. कधी लोकसभा निडणुका, कधी विधानसभा तर कधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात. निवडणुकांशिवाय आपल्याला दुसरा उद्योगच काय आहे. आता सर्व निवडणुका एकाच वेळी झाल्या तर एका अर्थाने चांगलं आहे. पण, त्या प्रामाणिक भावनेतून व्हायला हव्यात, असं आमदार पाटील यांनी सांगिलतं.

मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवर आमदार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री स्वत: मराठा समाजाचे आहेत, त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावता येईल. त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, याकडे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्याचं लक्ष वेधलं

ते आज कल्याण पूर्व भागातील आडिवलीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रभागातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी आले होते. यावेळी माजी नगरसेविका पाटील यांच्या आई शोभा पाटील उपस्थित होत्या.

मध्य प्रदेशात भाजपला भलमोठं खिंडार, दोन आमदारांसह 10 नेत्यांचा पक्षाला रामराम, कॉंग्रेसमध्ये प्रवेश 

दरम्यान, पीएम मोदींच्या सरकारचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष रणनीती आखत आहेत. त्यामुळे सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात एक राष्ट्र, एक निवडणूक विधेयक आणले जाण्याची शक्यता आहे. कारण निवडणुकीत जितका उशीर होईल तितका मोठा पराभव होईल हे भाजपला कळून चुकले, विरोधकांची ताकद वाढली तर आपला पराभव होईल, या भीतीने लवकरात लवकर निवडणुका घेण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका विरोधक करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube