आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

  • Written By: Published:
आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

पुणेः पुण्यातील भाजप आमदार मुक्ता शैलेश टिळक यांचे आज निधन झाले. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी सामना करत होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पुण्याचे महापौरपद त्यांनी भूषविले होते. त्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या. लोकमान्य टिळक यांच्या घराण्यातील सुनबाई म्हणून त्यांना मान होता. गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी सामना करत होत्या. आजारी असूनही त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली होती.

महापौर म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली होती. त्याच बळावर त्या २०१९ ला आमदार झाल्या. मात्र काही कालावधीतच त्यांना कर्करोगाशी सामना करावा लागला. याही परिस्थितीत त्यांनी विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याचा प्रयत्न केला.

आजारी असूनही चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यांच्या मतामुळे भाजप उमेदवारांचा विजय सोपा झाला होता. त्यावेळी त्यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक झाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube