Vijaysinh Mohite–Patil & Sharad Pawar : मोहिते पाटील तीन वर्षानंतर शरद पवारांच्या शेजारी बसले!

Vijaysinh Mohite–Patil & Sharad Pawar :  मोहिते पाटील तीन वर्षानंतर शरद पवारांच्या शेजारी बसले!

पुणे : एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेतील घटक असलेले विजयसिंह मोहिते पाटील (vijaysinh mohitepatil) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची तब्बल तीन वर्षांनंतर भेट झाली आहे. बारामतीत आज शरद पवारांच्या शेजारी विजयसिंह मोहिते पाटील बसल्याचं दिसून आलं.

बारामतीतील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाची शरद पवार आणि मोहिते पाटलांनी एकत्र पाहणी केली. यावेळी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा एकत्र दिसले.

प्रदीर्घ कालखंडानंतर दोन्ही नेते एकत्र आले आहेत. पवार आणि मोहिते पाटील एकत्र दिसल्याने या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. पवार आणि मोहिते पाटलांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दोन्ही नेते फार दुर गेले नसल्याचं बोललं जातंय.

मोहिते पाटील केव्हाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील अशी चर्चाही हा व्हिडिओ पाहुन होत आहे. दोन्ही नेते कृषि प्रदर्शनाच्या कार्यक्रमात एकत्र फिरले असून यावेळी या दोघामंध्ये संवाद झाला आहे. यावेळी दोघांकडूनही पाहणीदेखील करण्यात आलीय.

पूर्वीचे एकाच पक्षात कार्यरत असणारे मोहिते पाटील आज विरोधक असतानाही एकमेकांसोबत फिरत आहेत. त्यांचं हे दृश्य सुखावणारं असून राज्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी याचं अनुसरण केलं पाहिजे, तसेच एकमेकांविषयी सन्मान आणि स्नेह भाव जपला पाहिजे, अन्यथा द्वेष पेरुन राजकारण आणि समाजकारण साध्य होणार नसल्याचं चित्र दिसतंय.

सोलापूरातील माळशिरस तालुका म्हटलं की, शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे पाहिले जायचं. 2019 च्या निवडणुकीत मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

त्यावेळी मोहिते पाटील कुटुंबियांसाठी ही प्रतिष्ठेची निवडणुक मानली जात होती. त्यावेळी मोहिते पाटील कुटुंबाकडून मोठ्या ताकदीने भाजपचा प्रचार करण्यात आला. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या व्यासपीठांवर प्रचार करताना झळकले होते.

त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांची भाजपच्या केंद्रीय समितीवर विशेष निमंत्रित म्हणून निवड झाली, आणि ते भाजपचे अधिकृत सदस्य बनले होते. तेव्हापासून ते शरद पवारांपासून चार हात लांब होते. दरम्यान, आज ते बारामतीत एका कृषि प्रदर्शनात सोबत फिरल्याने चर्चेचा विषय ठरले आहेत.

शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या एकत्र येण्याने आता विजयसिंह मोहिते पाटलांची आगामी काळात काय भूमिका असणार आहे. त्यासोबत ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या वाटेवर असणार आहेत काय? शरद पवार त्यांना पुन्हा पक्षात येण्याची विनवणी करतीला का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळातच मिळतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube