आधी आभाळ बघायचं, वारं बघायचं मग नांगरायला घ्यायचं असतं, अमोल कोल्हेंचं सूचक वक्तव्य
MP Amol Kolhe On Upcoming election : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. कोल्हे हे मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटले होते. ते राष्ट्रवादीमध्ये (NCP) नाराज असल्यानेच त्यांनी ही भेट घेतली होती, असं बोलल्या जातं आहे. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरासाठी देखील कोल्हे हे गैरहजर होते. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी सुचक वक्तव्य करण्यास सुरूवात केली. खासकरून लोकसभा निवडणूक लढवणार का, लढवणार असाल तर कोणत्या पक्षातून लढवणार? तुम्ही राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यात किती तथ्य आहे? असे प्रश्न विचारल्यावर कोल्हे हे संदिग्ध उत्तरे देत आहेत. त्यामुळं अमोल कोल्हे राष्ट्रवादीत राहणार की, भाजपमध्ये (BJP) जाणार? या चर्चांना ऊत आला आहे.
अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्टार प्रचारक होते, माऊ, काही दिवसांपूर्वी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून अमोल कोल्हे यांना वगळण्यात आलं. त्यांतर कोल्हे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. खासदार कोल्हे हे आगामी लोकसभा निवडणूक लढणार की, नाही? तसेच भाजपमधून लढणार की, राष्ट्रवादीतून लढणार? याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर अमोल कोल्हे यांनी संदिग्ध उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आधी आभाळ बघायचं, वारं बघायचं अन् मग नांगरायला घ्यायचं असतं. उद्याची निवडणूक लढवायची की, नाही? कोठून लढवायची? ते आत्ता कशाला सांगायचं, ते वारं पाहून ठरवायचं असंत, असं सूचक विधान कोल्हे यांनी केलं आहे. त्यामुळं अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. ते कराडमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते, त्यावेळी कोल्हे बोलत होते.
काळाचा घाला, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात, 11 जणांचा जागीच मृत्यू
अमोल कोल्हे यांनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं होतं. त्यावर पत्रकारांनी विचारल असता कोल्हे यांनी पत्रकारांनाच उलटा प्रश्न विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं, याचा अर्थ भाजपमधून ऑफर आहे असा होतो का, असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला.
दरम्या,न याआधीही कोल्हे यांनी असेच विधान केले होते. आताही आभाळ पाहून, वारं पाहून मगच नांगरायला घ्यायचं असतं, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळं कोल्हे यांच्या मनात नेमकं चाललं तरी काय, ते राष्ट्रवादीचा सोडचिठ्ठी देणार का? हेच पाहणं महत्वाचं आहे.