नव्या संसदेच्या दारात मोदींची डिग्री लटकवा; राऊतांचा मोदींना खोचक टोला

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 03T113204.886

Sanjay Raut On PM. Narendra Modi :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरुन मोदींना टोला लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांची डिग्री हा चर्चेचा विषय होतो आहे. यावरुन मोठ्या प्रमाणावर राजकीय नाट्य पहायला मिळत आहे. त्यामध्ये आता खासदार संजय राऊत यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी मोदींच्या डिग्रीवरुन चांगलाच टोला लगावला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. गुजरात विद्यापीठाच्या डिग्रीचा हा फोटो असून 13 मार्च 1983 अशी त्यावर तारीख आहे. आमचे पंतप्रधान मोदींची ही डिग्री. लोक म्हणतात ही बोगस आहे. एन्टायर पोलिटिकल सायन्स विषयातली ही ऐतिहासिक, क्रांतिकारी पदवी. नव्या संसद भवनाच्या दारावर ही फ्रेम करुन लटकवा, म्हणजे लोक मोदींच्या पदवीवरुन संशय घेणार नाहीत. अशा शब्दामध्ये राऊतांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

PM Modi : भाजप पक्ष हा बोगस पदव्यांची फॅक्ट्री, संजय राऊतांचा घणाघात

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून मोदींच्या डिग्रीचा विषय चर्चेचा ठरला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री बोगस असून त्यांनी ती सार्वजनिक करावी, अशी मागणी केली होती. यावरुन गुजरात न्यायालयाने त्यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मोठी बातमी ! पुण्यात नऊ ठिकाणी ईडीची छापेमारी.. मुश्रीफांच्या अडचणी वाढणार

केजरीवाल यांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने गुजरात विद्यापीठाला मोदींची डिग्री सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. यावरुन गुजरात न्यायालयाने या निर्णयाला रद्द ठरवले आहे व केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube