Maharashtra Politics : माझी मुंबई, मी आणि माझी दुकानदारी, शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Maharashtra Politics : माझी मुंबई, मी आणि माझी दुकानदारी, शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निषाणा साधलाय. उध्दव ठाकरे यांचा ठरलेला कार्यक्रम म्हणजे, माझी मुंबई, मी आणि माझी दुकानदारी, असा थेट आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटातील वाद पुन्हा एकदा उफाळून समोर आलाय.

संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत जेलमध्ये गेल्यापासून डोक्यावर पडलाय. आम्ही 40 दगडांनी शिवसेनेचा सेतू बांधला होता हा सेतू संजय राऊत याने पडलाय. संजय राऊत नेता आहे की जोकर हेच कळत नाही, अशी जहरी टीका आमदार संजय शिरसाट यांनी केलीय. शिरसाट म्हणाले की, बाळासाहेबांमुळंच आम्ही आहोत, शिवसेनेवाल्यांनी बाळासाहेबांना लॉकरमध्ये बंद करुन ठेवलं होतं, आम्ही त्यांना बाहेर काढून त्यांचं मंदिर बनवत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचा फोटो वापरू नका असं सांगता, मग छत्रपती शिवाजी महाराज तुमचे कोण होते? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेता, ते तुमचे कोण होते? तरीही तुम्ही त्यांचं नाव घेता, मग बाळासाहेब हे देखील संपूर्ण देशाचे होते, असं संजय शिरसाट म्हटलंय.

संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांना प्रत्युत्तर दिलंय. शिरसाट म्हणाले की, या लोकांना राजकारण कळतं का हाच प्रश्न आहे. माझं थोबाड फोडण्याचं स्टेटमेंट कळलं नसेल म्हणून ते बोलत असावेत. अशा प्रकारे बाळासाहेबांच्या नावावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय.

अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांना आव्हान दिलं त्यावर संजय शिरसाट यांनीही दानवेंना चांगलंच सुनावलंय. त्याचवेळी महाराष्ट्रातील काही कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत, पण त्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय निघू शकतो, असंही यावेळी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube