खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रकृतीत सुधारणा; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला
MP Vasantrao Chavan : नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांची तब्येत स्थिर असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी डॉक्टरांशी संवाद साधला आहे. (Vasantrao Chavan) त्यांनी वसंतराव चव्हाण यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. आज मुख्यमंत्री रेवंत रेड्डी किम्स हॉस्पिटला जाऊन वसंतराव चव्हाण यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याची शक्यता आहे. प्रकृती खालावल्याने वसंत चव्हाण यांना नांदेडवरुन हैदराबाद येथे एअर ॲम्बुलन्सने उपचारासाठी नेण्यात आलं आहे.
Crime: धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या, पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू
सर्व कार्यक्रम रद्द
प्रकृती अस्वस्थतेमुळे खासादर वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मतदारसंघातील कार्यक्रम, विविध भेटीगाठी या सततच्या धावपळीमुळे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांना व्हायरल इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळं त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे. दरम्यान नांदेड येथून पुढील उपचारासाठी त्यांना हैदराबाद येथे नेण्यात आलं आहे. त्यामुळं वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याची माहिती चव्हाण कुटुंबीय, नायगाव तालुका काँग्रेस तसंच नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
उपलब्ध राहणार नाहीत
चव्हाण हे सतत कार्यमग्न असल्याने यादरम्यान त्यांना व्हायरल इन्फेक्शन झालं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ऑगस्ट रोजी नायगाव येथे आयोजित करण्यात आलेला महाकीर्तन सोहळा व महाप्रसादाच्या कार्यक्रमसह अभिष्टचिंतन सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसंच नांदेड जिल्ह्यातील सर्व नियोजन अभिष्टचिंतन सोहळे, कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. खासदार चव्हाण यांच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरु असलेल्यानं ते जनतेच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी नांदेड येथे उपलब्ध राहणार नाहीत अशी माहिती चव्हाण कुटुंबीयांनी दिली आहे.
जॉबची ऑफर आली अन् पठ्ठ्यानं क्रिकेटच सोडलं; 16 हजारी फलंदाजाचा क्रिकेटला गुडबाय..
चिखलीकरांचा पराभव
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात मागील दोन दशकांपासून प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी वयाच्या सत्तरीत लोकसभा निवडणूक लढवली आहे. या निवडणुकीत ते निवडूनही आले. खासदार अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर 2024 च्या लोकसभेत नांदेडची जागा काँग्रेसला मिळवून दिली. नायगाव विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे ते पहिलेच आमदार आहेत. त्यांना भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकरांचा पराभव करत मोठा विजय मिळवला होता. त्यांचा विजयाने अशोक चव्हाण यांच्यासाठी धक्का मानला गेला.