इमानदारी सिद्ध करायला सांगणाऱ्यांची लायकी काय? आव्हाडांचा मुंडेंवर संताप

इमानदारी सिद्ध करायला सांगणाऱ्यांची लायकी काय? आव्हाडांचा मुंडेंवर संताप

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसधील (NCP) दोन्ही गट आता चांगलेच आक्रमक झाले असून एकमेकांवर घणाघाती टीका करत आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी कोल्हापूर येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शेरो शायरी करत टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आव्हाड म्हणाले, शायरीच्या माध्यमातून शरद पवार यांना आव्हान देण्यात आले की तुम्ही इमानदार आहात हे सिद्ध करा. यांना शायरी किती समजते, हे मला माहिती नाही. शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला सांगण्याएवढी तुमची लायकी आहे का, असा सवाल आव्हाड यांनी केला. हातवारे करून शायरी करायला मजा येते पण, शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला महाराष्ट्र पडला आहे, असेही आव्हाड म्हणाले.

मुश्रीफांनी प्रेमाने मिठी मारली तरी बरगड्या राहणार नाही; धनंजय मुंडेंचा रोख कोणावर?

धनंजय मुंडे काय म्हणाले ? 

“हमारी कोई खता तो साबित कर… बुरे है तो बुरा साबित कर… तुझे चाहा है कितना ये तु क्या जाने…. चल हम बेवफाई सही… तु अपनी वफा तो साबित कर!” अशी शेरोशायरी करत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. साहेबांनी जीव द्यायला लावला असता तर दिला असता पण लोकशाही न मानता फक्त काही लोकांचा मतदारसंघ सांभाळण्यासाठी तुम्ही हे केलंत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तुम्ही मुश्रीफांना बदनाम करण्याचं काम केलं हे दुर्देव, असल्याचं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला होता.

राष्ट्रवादीच्या नव्या उदयास आलेल्या नेत्यांकडून संस्कारहीन बोलणं सुरु आहे, त्यांना साहेबांनी हेच शिकवलंय का? काय शिकवावं, ज्यांनी पायथानांची भाषा केलीयं, त्यांना धनंजय मुंडे यांनी एक प्रकारे इशाराच दिल्याचे या सभेत दिसून आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube