आमदार निलेश लंकेंना धक्का, कट्टर समर्थक झावरेंचा पराभव

  • Written By: Last Updated:
आमदार निलेश लंकेंना धक्का, कट्टर समर्थक झावरेंचा पराभव

अहमदनगरः पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्येही धक्कादायक निकाल लागले आहेत. वनकुटे गावामध्ये आमदार निलेश लंके यांच्या गटाचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झालाय. लंकेंसाठी हा मोठा धक्का आहे.

या ग्रामपंचायतीमध्ये अॅड. राहुल बबन झावरे हे प्रथम लोकानियुक्त सरपंच निवडून आले होते. यंदा ही जागा महिलांसाठी राखीव होती. यावेळी झावरे यांची पत्नी स्नेहल या सरपंचपदाच्या उमेदवार होत्या. त्यांचा स्थानिक विकास आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार सुमन निवृत्ती रांधवणे यांनी पराभव केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंकेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

वनकुटे हे गाव राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. या ठिकाणी आमदार लंके यांनी राहुल झावरे यांच्यासाठी जोर लावला होता. या ठिकाणी प्रतिष्ठेची लढाई होती. परंतु मतदारांनी प्रथम लोकानियुक्त सरपंच झालेल्या झावरे यांच्या पत्नीला पराभवाचा झटका दिला आहे. राहुल झावरे हे लंके यांचे कट्टर समर्थक आहेत. ते निलेश लंके प्रतिष्ठानचे प्रदेश सचिव आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube