स्लिप बॉय ते शिंदे सरकारमध्ये मंत्री; वाचा, ‘या’ आमदाराचा थक्क करणारा प्रवास !

स्लिप बॉय ते शिंदे सरकारमध्ये मंत्री; वाचा, ‘या’ आमदाराचा थक्क करणारा प्रवास !

मुंबई : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात ‘स्लिप बॉय’ असलेले संदिपान भुमरे ( Sandipan Bhumre) त्याच कारखान्याचे चेअरमन झाले. पाच वेळा निवडून येत त्यांनी आता कॅबिनेट मंत्रिपद मिळविले आहे. त्यांचा राजकीय प्रवास सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. संदिपान भुमरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. भुमरे यांचा जन्म १३ जुलै १९६३ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड बुद्रुक येथे झाला. त्यांचं शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत झालं आहे. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. १९९५ पासून ते पैठण मतदारसंघातून सलग ५ वेळा ते विधानसभेवर आमदारपदी निवडून आले आहेत. ठाकरे कॅबिनेटमध्ये त्यांच्यावर फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे मंत्री आहेत.

कोण आहेत संदीपान भुमरे? – औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते म्हणून संदीपान भुमरेंना ओळखलं जात. भुमरेंचा जन्म १३ जुलै १९६३ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड बुद्रुकमध्ये झाला. त्यांचं शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत झालं. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. १९९५ पासून ते पैठण मतदारसंघातून सलग ५ वेळा ते विधानसभेवर आमदारपदी निवडून आले आहेत. ठाकरे सरकारमध्ये ते फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.

कारखान्यात स्लिप बॉय ते चेअरमन – संदीपान भुमरे यांनी सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष केला. ते पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लिप बॉय म्हणून काम करत होते. मात्र, त्यानंतर त्याच कारखान्याचे ते चेअरमन झाले. कारखान्यात काम करत असतानाच त्यांनी १९८८ मध्ये पाचोडमध्ये शिवसेनेची शाखा स्थापन केली आणि राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९८९ मध्ये पाचोड ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अवघ्या तीन वर्षात त्यांनी पंचायत समितीचे उपसभातीपद मिळवले. पुढच्याच वर्षी म्हणजे १९९३ साली ते संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक झाले.

भुजबळांची बंडखोरी आणि भुमरे आमदार- शिवसेनेचे तत्कालीन बडे प्रस्त असलेले छगन भुजबळ यांनी बंडखोरी केली. भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार बबनराव वाघचौरे यांनीही बंडखोरी केली होती. त्यामुळे १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यायची हे शिवसेनेत ठरत नव्हते. शिवसेनेचे नेते, दिवंगत मोरेश्वर सावे हे बाहेरचे उमेदवार असल्याने त्यांच्या नावाला विरोध होत होता. त्यामुळे भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली. भुमरे यांनी ही निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी १९९९ आणि २००४ निवडणूकही जिंकली. संपूर्ण पैठण तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकवला.

पाचवेळा आमदार – संदीपान भुमरे हे सलग ३ वेळा विधानसभेवर निवडून गेले. मात्र, भुमरेंचा विजयरथ राष्ट्रवादीचे संजय वाघचौरे यांनी रोखला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत वाघचौरे विजयी झाले आणि भुमरे पराभवाला सामोरे जावे लागले. पण, यादरम्यान भुमरे यांनी मतदारसंघ बांधणीवर जोर दिला आणि पुढे २०१४ आणि २०१९ ची निवडणूक सहजपणे जिंकली. भुमरे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पैठण मतदारसंघातून दणदणीत मतांनी विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे यांचा १४ हजार १३९ मतांनी पराभव केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube