Pune By-Poll Results 2023 : कसब्याबाबत देवेंद्र फडणवीस यांचे भाकित ठरले खरे ….

Pune By-Poll Results 2023 : कसब्याबाबत देवेंद्र फडणवीस यांचे भाकित ठरले खरे ….

पुणे :  कसबा विधानसभेत  काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 72599 मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांना 61771  मते मिळाली आहेत. रवींद्र धंगेकर या निवडणुकीत विजयी झाले आहेत.  धंगेकर यांनी पहिल्या फेरीपासून आपल्या मतांची आघाडी कायम  ठेवली होती. दरम्यान कसबा निवडणुकीचे भाकित  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच वर्तवले होते.

गेले काही दिवस उद्भव ठाकरे गट आणि भाजप त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्यात कमालीच वितुष्ट आले आहे. शिवसेना फूट , अनिल परब यांच्या मागे ईडी सीबीआय चा सशेमीरा या सर्व बाबी पहिल्या तर हे वितुष्ट टोकाला गेल आहे. भाजपाच्या या कारवाई विरोधात अनिल परब मुंबई ते दिल्ली असा किल्ला लढवत आहे. दोन दिवसांपूर्वी  विधीमंडळाचे  कामकाज संपल्यावर विधिमंडळ पोर्चमध्ये पत्रकार आणि अनिल परब गप्पा मारत उभे होते . कसबा निवडणुक विषयी यात गप्पा सुरु होत्या. याच वेळी देवेंद्र फडणवीस हे समोरून जात असताना अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कडे बोट दाखवला. “कसबा बद्दल याना जास्त माहिती आहे. “ अस पत्रकारराना सांगितले.

यावर स्वतः अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांना आवाज देत म्हटल, पत्रकार विचारताय कसबा बद्दल काय? तुम्ही अंदाज सांगा. देवेंद्र फडणवीस या विषयावर बोलत असताना “ कसबा निवडणुक तशी टफ आहे” असा संवाद सुरु होता. अशात टीव्ही कॅमेरा येताच देवंद्र फडणसीस यांनी स्वतःला सावरले. व्हिडिओ मध्ये अनिल परब शेजारी आहेत हे लक्षात येताच  या ठिकाणाहून निघूनजाण पसंद केले. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या परभवाची चाहुल फडणवीसांनी आधीच लागली होती का असा प्रश्न विचारला जात आहे.

Chinchwad Bypoll Election Result 2023:… तर साहेबांनी तेवढा विकासचं केलाय ; अश्विनी जगताप यांची भावनिक प्रतिक्रिया

दरम्यान पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने निकालाकडे बघताना फारसा उत्साह वाटत नसल्याची प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी दिली आहे. आज साहेबांची खूप आठवण येतेय. निकालाकडे बघितलं तर फार उत्साह नाही. पण लोकांना न्याय द्यावा, त्यांच्या पाठीवर हात फिरवणारं कुणीतरी आपलं असावं, त्यांची कामं वेळच्यावेळी व्हावीत, त्यांना भक्कम आधार देणारं कुणीतरी असावं यासाठी खरंतर मी निवडणुकीसाठी उभी राहिले. ही साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे.

Election Results 2023 Live : नागालॅंड भाजपपुढे पण मेघालयमध्ये एनपीपी ठरणार मोठा पक्ष

 

कसबा पेठ विजयावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय हा महाविकास आघाडीची एकजूट व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय आहे.
जनमताचा हा कौल भाजप विरोधात आहे. हा जनशक्तीचा धनशक्तीवर विजय आहे. हा निकाल महाराष्ट्रातील वातावरण बदलल्याचे संकेत आहेत. काँग्रेस पक्षाने लोकप्रिय व सक्षम उमेदवार दिला आणि त्यांच्या विजयासाठी मतदारांनी सत्ता व पैशाची दडपशाही झुगारून लावली. नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि विजयासाठी परिश्रम घेणार्‍या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व मतदारांचे आभार.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube