आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडेच

  • Written By: Published:
आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडेच

पुणेः आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गटाने बाजी मारली आहे. या तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतीवर वळसे पाटील गटाची सत्ता आली आहे. एक ग्रामपंचायत शिंदे गटाकडे, तर एक ग्रामपंचायत ठाकरे गटाला मिळाली आहे.

आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील नागापूर, डिंभे खुर्द, आहुपे, तळेघर, चिखली या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. तर उर्वरित १६ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस गटाने बाजी मारली आहे.

घोडेगाव ही ग्रामपंचायत मोठी आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस गटाने सत्ता राखली आहे. तर चिंचोडी ग्रामपंचायतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सत्ता मिळाली आहे. तर साल ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटाची सत्ता आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube