Pune : पुण्यात वातावरण पेटले ; शिंदे-फडणवीसांची जाहीर सभा तर अजितदादांची बाईक रॅली

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (44)

पुणे :  कसबा ( Kasaba )  व पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad )  पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच पक्षाकडून आता प्रचारासाठी जोर लावण्यात येतो आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने ( Hemant Rasne )  यांच्या प्रचारासाठी आज कसब्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde )  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis )  येणार आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar )  यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार हे येणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कसबा पेठेत प्रचारासाठी येणार आहेत. गणेश मंडळाच्या अध्यक्षांच्या शिंदे भेटी घेणार आहेत. तसेच विविध समजातील प्रतिनिधींच्या व पुणे शहरातील प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांची आज संध्याकाळी सहा वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा नातू बागेच्या मैदानात होणार आहे.

याचबरोबर विरोधी पक्ष नेते अजित पवार हे कसब्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आज बाईक रॅली काढणार आहेत. तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे या हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये आज भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जाहीर सभा होणार आहेत. तसेच राज्यातील मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण हे नेते देखील आज पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार करणार आहेत.

त्यामुळे आता मतदानाला काहीच दिवस शिल्लक असताना दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. भाजपने आपली संपूर्ण टीम या प्रचारासाठी उतरवली आहे. यामुळे प्रचाराची चुरस आता आणखी वाढली आहे.

Tags

follow us