मुळा धरण, एमआयडीसी, वांबोरी चारी हे सर्व कर्डिलेंचे स्वप्न पूर्ण करणार; राहुरीतील सभेत फडणवीसांची ग्वाही
Devendra Fadanvis-अक्षय कर्डिले हे मतदारसंघातील विकासकामांची मागणी करतील, त्याची मी स्वतः पूर्तता करेल.
Rahuri By election-राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By election) भाजपचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची राहुरीत जोरदार सभा झालीय. अक्षय कर्डिले हे मतदारसंघातील विकासकामांची मागणी करतील, त्याची मी स्वतः पूर्तता करेल, असे आश्वासन फडणवीस यांनी सभेत दिलीय. मुळा धरण, एमआयडीसी, वांबोरी चारी असे सर्व प्रश्न सोडविण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे, मंत्री राधाकृष्ण विखे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, संग्राम जगताप, अमोल खताळ, काशिनाथ दाते, विठ्ठलराव लंघे, डॉ. सुजय विखे हे व्यासपीठावर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, पोटनिवडणूक आली नसती तर आधिक आनंद झाला असता. शिवाजीराव कर्डिले यांचे दिलखुलास व्यक्तिमत्व होते. अतिशय जवळचा संबंध त्यांच्याशी आला. चांगली मैत्री देखील झाली. कर्डिले हे जनतेतील माणूस होता. राजकारणात चाणक्ष्य बुध्दी असलेले धोरणी राजकारणी होते. कोणाला नेता बनावयचे आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा, याची नेमकी माहिती असलेले नेते होते. कोणी आडवा आला तर सोडायचे नाही, ते पहिलवान गडी होते.
कर्डिले कधी डगमगले नाहीत-फडणवीस
शरीराने नाही तर मनाने ते पहिलवान गडी होते. कधी हार मानात नव्हते. अनेक विपरित परिस्थितीत त्यांना जावे लागले आहे. राजकारणात अनेक वेळा अनेक अडचणीतून येतात. त्यांना सामना करावा लागला. राजकारणात अनेक वेळा व्यवस्थेचे बळी जावे लागते. ते सगळा काळ आम्ही जवळून पाहिले आहे. ते डगमगले नाहीत. संघर्ष सोडला नाही. ते कुणाला नतमस्तक झाले नाही. संघर्षशील त्यांचे व्यक्तिमत्व होते, असे फडणवीस म्हणाले.
निळवंडे, वांबोरी चारीचे प्रश्न मांडायचे
कर्डिलेसाहेबांचे काम पूर्ण करायचे होते. त्यांचे अनेक स्वप्न होते. ते निळवंडे आणि वांबोरी चारीच्या पाण्याचा प्रश्न मांडायचे आहे. शेवटी कर्डिले यांच्या आगृहामुळे सव्वाशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. निळवंडेची काम पूर्ण झाले. त्यातून अनेक गावांमध्ये पाणी पोहचत आहे. अनेक प्रत्येक गावांपर्यंत समृद्धीचे स्वप्न कर्डिले यांनी पाहिले आहे, त्याचे स्वप्न पूर्ण करायचे असल्याचे फडणवीस म्हणाले. खऱ्या अर्थाने सगळ्यांनी शिवाजीराव कर्डिलेंवर प्रचंड प्रेम केले आहे. आज तुम्ही शिवाजीराव कर्डिले तेवढे प्रेम केले आहे, त्याचा दीडपट प्रेम आम्ही अक्षय कर्डिलेंवर करत आहोत. अक्षय कर्डिलेंनी मागितलेले सगळ्या गोष्टी पूर्ण करू. ही निवडणूक सगळ्यांची आशीर्वादामुळे अक्षय जिंकेल. अक्षय कर्डिले यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून द्यायचे आहे. संग्राम जगताप आणि सुजय विखे या दोन युवा नेत्यांच्या खांद्यावर ही निवडणूक असल्याचे फडणवीस म्हणाले. प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीत माघार घेतल्याबद्दल त्यांचे आभारही फडणवीस यांनी मानले.
मुळा धरण ते एमआयडीसी
मुळा धरणातून गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. कृषी विद्यापीठाचे जी अधिकची जागा आहे, त्यात एक हजार एकर जागेवर मोठी एमआयडीसी सुरू करून रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे फडणवीस म्हणाले.