Ramdas Athawale : भाजप-शिंदे गटावर आठवलेंची नाराजी

  • Written By: Published:
Ramdas Athawale : भाजप-शिंदे गटावर आठवलेंची नाराजी

साताराः आरपीआयचे (RPI) राष्ट्रीय अध्यक्ष व मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी भाजप-शिंदे गटाबाबत एक खंतही व्यक्त केली. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनासोबत आमच्या रिपब्लिकन पक्षाचे नाव घेतले जात नाही. ही खंत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटून सांगणार आहोत, असे आठवले म्हणाले आहेत.

महाबळेश्वर येथे हॉटेल ब्ल्यू पार्कमध्ये आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या एक दिवसीय अभ्यास शिबिरात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. आठवले म्हणाले,
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता हाती घेण्याचा उपदेश केला आहे. त्यामुळे समाजाला सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी सत्ता मिळविणे हेच आमचे मिशन आहे.

रिपब्लिकन पक्ष भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत युतीमध्ये आहे. आगामी सर्व निवडणूका आम्ही भाजप बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत युती करून लढणार आहोत. मात्र भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनासोबत आमच्या रिपब्लिकन पक्षाचे नाव घेतले जात नाही. ही खंत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगणार आहोत, असे आठवले म्हणाले.

रिपब्लिकन पक्षाचे संघटन सर्व समाज घटकांनासोबत घेऊन व्यापक करावे. पक्ष संघटन मजबूत करावे. रिपब्लिकन पक्षाला सत्तेत सन्मानाचा वाटा घ्यायचा असेल तर पक्षसंघटन माजबूत करावे असे आवाहन आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

डॉ.अच्युत माने, डॉ. ऋषिकेश कांबळे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, अॅड. दिलीप काकडे यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, सीमाताई आठवले उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube