Rashmi Barve : रश्मी बर्वे यांना मोठा धक्का, जात पडताळणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Rashmi Barve : रश्मी बर्वे यांना मोठा धक्का, जात पडताळणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Rashmi Barve : सुप्रीम कोर्टाकडून ( Supreme Court) काँग्रेसच्या (Congress) रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांना मोठा झटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीचा ( Lok Sabha Election) उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने रश्मी बर्वे यांचं उमेदवारी अर्ज बाद झाला होता. काँग्रेसने त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर जात पडताळणीचं प्रकरण समोर आलं होतं आणि आता या प्रकरणामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.

रश्मी बर्वे यांनी या प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत रश्मी बर्वे यांना मोठा धक्का दिला. जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि सामाजिक न्याय विभागाकडून माझ्यावर करण्यात येत असलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत बर्वे यांनी केला होता.

सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाहीच

रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या समितीच्या निर्णयाला नागपूर खंडपीठाने 4 एप्रिल रोजी अंतरिम स्थगिती दिली होती. मात्र, लोकसभा निवडणुक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत बर्वे यांची उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळली होती. त्यामुळे रश्मी बर्वे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाकडूनही रश्मी बर्वे यांना दिलासा मिळाला नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे रामटेकमधून अधिकृत उमेदवार असतील.

नेमकं प्रकरण काय ?

सुनील साळवे यांनी केलेल्या तक्रारीनंतर जात पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचे कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र रद्द केले होते. यानंतर रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज देखील रद्द करण्यात आला होता. सुनील साळवे यांनी रश्मी बर्वे यांनी जात प्रमाणपत्र तयार करताना बनावट कागदपत्र दिल्याची तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागाकडून याप्रकरणी चौकशी करून अहवाल तात्काळ देण्याची सूचना जात पडताळणी समितीला करण्यात आली होती. आज रश्मी बर्वे यांचे अनुसूचित जातीतील ‘चांभार’ जातीचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे पक्ष जाणून घेत सुनावणी पूर्ण केली व रश्मी बर्वे यांची रामटेकमधून उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube